अष्टपैलू कौशल करणार गोव्याचे नेतृत्व..!

कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 20 सदस्यीय संघ जाहीर
अष्टपैलू कौशल करणार गोव्याचे नेतृत्व..!
Goa Sports : Koushal Hattangadi Will lead Goa Dainik Gomantak

पणजी : अष्टपैलू कौशल हट्टंगडी (Koushal Hattangadi) आगामी कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे (Goa Sports) नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखालील 20 सदस्यीय संघ गोवा क्रिकेट असोसिएशनने सोमवारी जाहीर केला.

Goa Sports : Koushal Hattangadi Will lead Goa
सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा तडाखा.. !

स्पर्धा गुजरातमधील सूरत येथे खेळली जाईल. स्पर्धेच्या विलगीकरण प्रक्रियेत गोव्याचा संघ स्पर्धास्थळी 21 नोव्हेंबर रोजी रुजू होईल. गोव्याचा एलिट क गटात समावेश असून पहिला सामना 29 नोव्हेंबरपासून खेळला जाईल.

गोव्याचे एलिट क गटात महाराष्ट्र, हिमाचल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू या संघाविरुद्ध सामने होतील. कुचबिहार करंडक स्पर्धेतील सामने चारदिवसीय आहेत. पहिला सामना 29 नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रविरुद्ध होईल. नंतर तमिळनाडूविरुद्ध (6 ते 9 डिसेंबर), हिमाचलविरुद्ध (13 ते 16 डिसेंबर), छत्तीसगडविरुद्ध (20 ते 23 डिसेंबर), मध्य प्रदेशविरुद्ध (27 ते 30 डिसेंबर) गोव्याचा सामना होईल.

Goa Sports : Koushal Hattangadi Will lead Goa
IND vs NZ: राहुल द्रविडसोबत काम करण्यास अन् नवीन आव्हान स्विकारण्यास उत्सुक

गोव्याचा 19 वर्षांखालील संघ

कौशल हट्टंगडी (कर्णधार), दीप कसवणकर, शिवेंद्र भुजबळ, लख्मेश पावणे, आयुष वेर्लेकर, आर्यन नार्वेकर, फरदीन खान, देवनकुमार चित्तम, सनथ नेवगी, इझान शेख, वीर यादव, आयुष कारापूरकर, श्रेयश उसगावकर, विनायक कुंटे, उदित यादव, सय्यद जुनेद अहमद, मनीष काकोडे, सुजय नाईक, राजन सरोज, नामदेव राऊळ.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com