Goa Sports: मारियान, केशव जोडी बॅडमिंटन दुहेरीत विजेती

Goa Sports: मिश्र दुहेरीत एलिसा व मिलाग्रिना जोडीस विजेतेपद
Goa Sports: मारियान, केशव जोडी बॅडमिंटन दुहेरीत विजेती
Goa Sports : Marian Anthony and Keshav NaikDainik Gomantak

पणजी ः गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (Sports Authority of Goa) क्रीडा आणि तंदुरुस्ती सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या कर्मचारी पातळीवरील बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेत पुरुष दुहेरीत मारियान अँथनी आणि केशव नाईक जोडीने विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्यांनी रॉय अताईद व नितीन वेर्णेकर जोडीस हरविले. स्पर्धा फोंडा येथील इनडोअर स्टेडियममध्ये (Ponda Indoor Stadium) झाली.

Goa Sports : Marian Anthony and Keshav Naik
Goa Sports: फुटबॉलपटू ब्रुनो यांचे क्रिकेट कौशल्य!

मिश्र दुहेरीत एलिसा फालेरो व मिलाग्रिना मस्कारेन्हास जोडीने विजेतेपद मिळविताना वालंकी धुमासकर व रेमेडियस कुलासो जोडीस हरविले. स्पर्धेचे उद्‍घाटन गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, प्रशिक्षण संचालक ब्रुनो कुतिन्हो, प्रशासकीय संचालक शंकर गावकर, गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे, क्रीडा प्राधिकरणाचे खजिनदार अश्रफ पंडियाल यांच्या उपस्थितीत झाले.

Goa Sports : Marian Anthony and Keshav Naik
Goa Sports: राज्यातील क्रीडापटूंसाठी ‘गुड न्यूज’

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com