क्रीडा मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला विरोध..

कारापूर-सर्वणच्या ग्रामसभेत मैदानाचा मुद्दा तापला..
क्रीडा मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला  विरोध..
Goa Sports : क्रीडा मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला विरोध..Dainik Gomantak

डिचोली: कारापूर येथील नियोजित क्रीडामैदानाच्या (Goa Sports) विषयावरुन कारापूर-सर्वणची आज (रविवारी) झालेली ग्रामसभा काहीसी तापली. आम्हाला त्वरित क्रीडामैदान उपलब्ध करून द्या. अशी मागणी स्थानिक युवकांनी करतानाच, मैदानासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेत 'एमआरएफ' (मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी) शेडला कडाडून विरोध केला. हा प्रकल्प मैदानाच्या जागेत सोडून अन्यत्र उभारा. अशी मागणीही उपस्थित युवकांनी करून, तसा ठराव घेतला.

Goa Sports : क्रीडा मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला  विरोध..
'भाजपला' सत्तेपासून दूर लोटा; दिनेश गुंडू राव

सरपंच दामोदर गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेवेळी पंच गोकुळदास सावंत, रसूल मदार, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर, उज्वला कवळेकर, नीता मोरजकर आणि रश्मी नाईक उपस्थित होते. तर सुषमा सावंत, दत्तप्रसाद खारकांडे आणि आजस खान अनुपस्थित होते. या ग्रामसभेला युवकांनी गर्दी केली होती. सरपंच श्री. गुरव यांनी स्वागत केले. पंचायत सचिव सुजाता मोरजकर यांनी मागील इतिवृत्त सादर केले. या ग्रामसभेत प्रामुख्याने मैदानाचा विषय चर्चेत आला. सरपंच दामोदर गुरव आणि पंच गोकुळदास सावंत यांनी उपस्थित युवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

पंच असमर्थ

सार्वजनिक रस्त्यावर घाण पाणी सोडण्याच्या प्रकाराबद्दल तक्रार केल्यास संबंधित प्रभागातील पंचांकडून कानावर हात ठेवण्यात येत आहे. अशी तक्रार विष्णू मेणकूरकर यांनी केली. यावेळी काहीसा वाद निर्माण झाला.

Goa Sports : क्रीडा मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला  विरोध..
अखेर GUJ ने आंदोलन मागे घेतले..!

'एमआरएफ' शेडला विरोध

क्रीडामैदानासाठी आरक्षित केलेल्या जागेत (सर्व्हे क्र-22/2) सुका कचरा ठेवण्यासाठी 'एमआरएफ' शेड बांधण्याचा पंचायतीचा प्रस्ताव आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही शेड बांधणे आवश्यक आहे. अन्यथा पंचायतीवर कारवाई अटळ असल्याची माहिती पंचायत सचिव मोरजकर यांनी दिली. यावेळी सदर शेड शाळा आणि लोकवस्तीजवळ असलेल्या मैदानाच्या जागेत नको. अशी मागणी उपस्थित युवकांनी केली. एमआरएफ शेडसाठी कोमुनिदाद किंवा अन्य पर्यायी जागा शोधा. अशी सूचना पोकळे यांनी केली. मैदानाचे काम त्वरित मार्गी लावा. अशी मागणी केल्यानंतर या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सरपंच गुरव, पंच लक्ष्मण गुरव आणि युवकांचा समावेश असलेली समिती निवडण्यात आली. पोकळे, समीर वायंगणकर, विष्णू मेणकूरकर, विजय मठकर आदीनी विविध प्रश्न उपस्थित केले. विकासकामांसंदर्भात पंचायतीसमोर काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना भेटून त्यावर उपाय काढावा. अशी सूचना विष्णू मेणकूरकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com