Goa Sports: वास्कोच्या चंद्रकांतचे एका मिनिटात 8083 वेळा फुटबॉल ‘जगलिंग’

Goa Sports : आदर्श राज याने दुसरा क्रमांक मिळविताना 7105 वेळा फुटबॉल जगलिंग केले
Goa Sports: वास्कोच्या चंद्रकांतचे एका मिनिटात 8083 वेळा फुटबॉल ‘जगलिंग’
Goa Sports : Chandrakant HarijanDainik Gomantak

पणजीः वास्को (Vasco) येथील चंद्रकांत हरिजन (Chandrakant Harijan) याने अफलातून फुटबॉल कौशल्य प्रदर्शित करताना एका मिनिटात 8083 फुटबॉल ‘जगलिंग’ (Football Juggling) साधले. गोवा क्रीडा प्राधिकरणाने (Sports Authority of Goa) क्रीडा आणि तंदुरुस्ती सप्ताहानिमित्त घेतलेल्या या उपक्रमात चंद्रकांतने हा पराक्रम एका प्रयत्नात साधला. फातोर्डा, पेडे व बांबोळी येथे प्राथमिक फेरी घेण्यात आली. त्यातून अंतिम फेरीसाठी पाच जणांची निवड करण्यात आली होती. आदर्श राज याने दुसरा क्रमांक मिळविताना 7105 वेळा फुटबॉल जगलिंग केले. निकाल ः 11 ते 15 वर्षे वयोगट मुलगे ः पियष मालविय (776), इमॅन्युएल गामा (640), वेदांत नाईक (551), 16 ते 20 वर्षे वयोगट ः चंद्रकांत हरिजन (8083), आदर्श राज (7105), देवेंद्र पुरी (5357), मुली ः 11 ते 15 वर्षे वयोगट ः सिया आल्मेदा (180), 16 ते 20 वर्षे वयोगट ः आमांदा डायस (770).

Goa Sports : Chandrakant Harijan
Goa Sports: मारियान, केशव जोडी बॅडमिंटन दुहेरीत विजेती

कॅरममध्ये गौरेश-दिनेश जोडी विजेती
गोवा क्रीडा प्राधिकरणाने क्रीडा आणि तंदुरुस्ती सप्ताहानिमित्त घेतलेल्या आंतरकर्मचारी दुहेरी कॅरम स्पर्धेत गौरेश फडते व दिनेश गावडे जोडीने विजेतेपद मिळविले. त्यांनी विनय सांभारी व संतोष म्हापसेकर जोडीवर मात केली. मिश्र दुहेरीत आनंद नाईक व स्नेहल परवार जोडीने विजेतेपद प्राप्त करताना एरिसा फालेरो व वालंकी धुमासकर जोडीस नमविले. स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली.

Goa Sports : Chandrakant Harijan
Goa Sports: फुटबॉलपटू ब्रुनो यांचे क्रिकेट कौशल्य!

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com