CK Nayudu Trophy : विजयासाठी गोव्याने गाळला घाम; अरुणाचल प्रदेशचा हा सलग पाचवा पराभव

अरुणाचलवर डाव व 229 धावांनी मात
Keith Pinto
Keith PintoDainik Gomantak

CK Nayudu Trophy : गोव्याने कर्नल सी. के. नायडू करंडक करंडक 25 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात मंगळवारी अरुणाचल प्रदेशला डाव व 229 धावांनी एकतर्फी हरविले व बोनस गुणाचीही कमाई केली, पण प्रतिस्पर्ध्यांच्या शेवटच्या तीन विकेटने त्यांना घाम गाळायला लावला.

सांगे येथील जीसीए मैदानावर सामना तिसऱ्या दिवशी संपला. अरुणाचल प्रदेशने दुसऱ्या डावात सातवी विकेट गमावली तेव्हा त्यांच्या 98 धावा होत्या. त्यानंतर अखेरच्या तीन विकेटने धावसंख्येत 112 धावांची भर टाकली.

Keith Pinto
IND vs AUS Test: टेन्शन नॉट! रोहित-विराटचा सर्वात मोठा शत्रू पहिल्या सामन्याला मुकणार

त्यामुळे अरुणाचलला 210 धावापर्यंत मजल मारता आली. आंध्रविरुद्ध पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात 218 धावा केल्यानंतर आणि सात डावानंतर अरुणाचलने प्रथमच दोनशेपेक्षा जास्त धावा केल्या.

गोव्याचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय असून त्यांचे आता पाच लढतीनंतर 10 गुण झाले आहेत. अरुणाचल प्रदेशला हा सलग पाचवा पराभव ठरला.

कीथ पिंटोने टिपले सहा गडी

गोव्याचा डावखुरा फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याने 32 धावांत 6 गडी टिपून कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. योगेश कवठणकर याच्या फिरकीने तळाच्या फलंदाजांना रोखताना तीन गडी बाद केले.

अरुणाचल प्रदेशचा नवव्या क्रमांकावरील फलंदाज शुहेल अन्सारी याने आक्रमक अर्धशतक नोंदविताना 64 चेंडूंत सात चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या.

Keith Pinto
Sail India Nationals : सेल इंडिया स्पर्धेत गोव्याची चमकदार कामगिरी; कात्याने जिंकले सुवर्ण तर डेन, पर्ल यांना रौप्यपदके

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 6 बाद 553 घोषित वि. वि. अरुणाचल प्रदेश, पहिला डाव : 114 व दुसरा डाव (2बाद 31 वरून) : 73.3 षटकांत सर्वबाद 210 (राजेशकुमार राय 33, निष्कर्ष सिंग 31, त्सेरिंग थापके 11, शुहेल अन्सारी नाबाद 55, टिक ली 24, आर्यन साहानी 20, शुभम तारी 14-3-50-0, समीत आर्यन मिश्रा 10-2-21-1, कीथ पिंटो 19-6-32-6, मनीष काकोडे 10-1-36-0, दीप कसवणकर 10-2-40-0, योगेश कवठणकर 8.3-2-20-3, दीपराज गावकर 2-1-4-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com