Vijay Merchant Trophy: दिशांकच्या आक्रमक खेळीने झारखंडविरुद्ध गोव्याचा वेग कायम

झारखंडचा संघ 275 धावांनी पिछाडीवर
Vijay Merchant Trophy
Vijay Merchant Trophy Dainik Gomantak

पणजी: जोमदार फॉर्ममधील दिशांक मिस्कीन याने शैलीदार फलंदाजी कायम राखताना आणखी एक शतक नोंदविले, त्यामुळे विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला झारखंडविरुद्ध सुस्थिती गाठता आली. हा सामना नागपूर येथील लेडी अमृतबाई डागा महाविद्यालय मैदानावर सुरू आहे.

(Goa team is in a good position playing against Jharkhand in Vijay Merchant Trophy )

कर्नाटकविरुद्ध मागील लढतीत पहिल्या डावात नाबाद 101 धावा केलेल्या दिशांकने शनिवारी 144 धावांची खेळी केली. गोव्याचा कर्णधार यश कसवणकर याचे शतक मात्र सात धावांनी हुकले. दिशांक व यश यांनी सातव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला पहिल्या डावात 385 धावा करता आल्या.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर झारखंडने 2 बाद 110 धावा केल्या होत्या. ते अजून 275 धावांनी मागे आहेत. दिशांकने 327 चेंडूंतील मॅरेथॉन खेळीत 22 वेळा चेंडू सीमापार केला. यश 93 धावांवर त्रिफळाचीत बाद झाला. त्याने 122 चेंडूंतील खेळीत 19 चौकार मारले.

Vijay Merchant Trophy
Morocco vs Croatia: आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला मिळणार 220 कोटी रूपयांचे बक्षीस

85.8 च्या सरासरीने 429 धावा

दिशांक मिस्कीनने विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट चमकदार फलंदाजी केली आहे. आतापर्यंत सहा डावांत एकवेळ नाबाद राहत त्याने 85.8 च्या सरासरीने 429 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके व दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

Vijay Merchant Trophy
India vs Bangladesh Test: विजयासाठी भारताला 4 विकेट्स तर बांग्लादेशला 241 धावांची गरज

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ( कालच्या 6 बाद 281 वरून ) : 145. 4 षटकांत सर्वबाद 385 ( यश कसवणकर 93, दिशांक मिस्कीन 144, शिवेन बोरकर 3, सिश्त प्रकाश नाबाद 7, द्विज पालयेकर 0, अभयकुमार सिंग 4-57 ).

झारखंड, पहिला डाव : 32 षटकांत 2 बाद 110 (वत्शल तिवारी नाबाद 54, विवेक कुमार नाबाद 26, यश कसवणकर 10-2-32-1, वेदांत डब्राल 9-1-21-1, सिश्त प्रकाश 6-2-20-0, चिगुरुपती व्यंकट 7-0-29-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com