Goa: मुलांचा संघाने 'राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट' स्पर्धेत मिळवले उपविजेतेपद

टेनिस क्रिकेटमध्ये गोव्याच्या मुलांना उपविजेतेपद मिळवले.
Goa: मुलांचा संघाने 'राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट' स्पर्धेत मिळवले उपविजेतेपद
राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट संघ Dainik Gomantak

पणजी: आग्रा (Agra)येथे झालेल्या २८व्या राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट (Tennis Ball Cricket)स्पर्धेत गोव्याला मुलांच्या गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत त्यांना उत्तर प्रदेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

गोव्याने (Goa)स्पर्धेत आगेकूच राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत विदर्भास 27 धावांनी हरविले. नंतर उपांत्यपूर्व फेरीत मुंबईला,(mumbai) तर उपांत्य फेरीत बिहारला हरवून गोव्याने अंतिम फेरीत स्थान मिळविले.

उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत 43 धावा केल्या. गोव्याच्या पुनीत खांडेपारकर याने दोन, तर विजय हळगेकर व साईश गावडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट संघ
Goa: ऋतूज, सेल्विनचे टेबल टेनिस प्रशिक्षणात यश

उत्तरादाखल गोव्याने निर्धारित सहा षटकांत पाच गडी गमावून 38 धावा केल्या. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचे बक्षीस गोव्याच्या साईश गावडे याला मिळाले.

मुलींच्या गटात गोव्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत आटोपले. महाराष्ट्राने त्यांच्यावर मात केली. सामना टाय (Tie)झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राने (maharashta)बाजी मारली.

Related Stories

No stories found.