National Games: 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा सरकार कटिबद्ध

राज्य सरकार अनुकूल: येत्या बुधवारी होणार शिक्कामोर्तब
Goa Sports Minister Govind Gaude
Goa Sports Minister Govind GaudeDainik Gomantak

पणजी: 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी गोवा सरकारने असमर्थता दर्शवल्यानंतर याचे यजमानपद गुजरातने स्विकारले या स्पर्धा सध्या गुजरातमध्ये सुरू आहेत. तर 37 वी राष्ट्रीय स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये गोव्यात आयोजित करण्यासाठी गोवा सरकारने सहमती दर्शविली आहे.

(Goa to Host 37th National Games in October 2023, IOA Confirms)

Goa Sports Minister Govind Gaude
Goa Politics : भाजप विरोधात मोट बांधण्यास विजय सरदेसाईंकडून सुरवात

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) सचिव राजीव मेहता यांनी गोव्याचे क्रीडा सचिव अजित रॉय यांना पत्र पाठवून 37 व्या गोवा सरकारच्या स्पर्धा यजमानपदाच्या प्रस्तावास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. पुढील वर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हँगझू येथे 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेच्या अनुषंगाने गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख ठरविण्यात येईल, असे मेहता यांनी राज्य क्रीडा सचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Goa Sports Minister Govind Gaude
Goa Traffic Rules Violation : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना इंगा, कळंगुट पोलिसांची कारवाई

गुजरातमधील सहा शहरांत सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप 12 ऑक्टोबरला सूरत येथे होईल. त्या कार्यक्रमात 27 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आयओए ध्वज गोव्याच्या शिष्टमंडळाकडे सुपूर्द करण्याबाबत राजीव मेहता यांनी पत्रात नमूद केले आहे.``समारोप सोहळ्यास मी उपस्थित राहणार आहे. आम्हाला आयओए सचिवांचे पत्र मिळाले आहे. पुढील स्पर्धेचा ध्वज मी गोवा सरकारतर्फे स्वीकारणार आहे,``अशी माहिती गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी दिली.

ऑक्टोबर योग्य कालावधी: क्रीडामंत्री गावडे

गोव्यातील पावसाळा लक्षा घेता, 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधीत योग्य राहील, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील गोव्यात होणाऱ्या सामन्यांबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते. ``राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे. पुढील वर्षीच्या स्पर्धेपूर्वी गोवा पूर्णपणे सज्ज होईल, साधनसुविधा तयार असतील,`` असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com