Goa: महिला फुटबॉल लीगमध्ये युनायटेड क्लबचा सलग दुसऱ्यांदा विजय

सामन्याच्या 41 व्या मिनिटास रिझेला हिने तळावली संघची (Team) स्थिती 3-0अशी मजबूत केली. 82 व्या मिनिटास स्टेसीने संघाच्या विजयावर (Win) शिक्कामोर्तब करणारा गोल केला.
Goa: महिला फुटबॉल लीगमध्ये युनायटेड क्लबचा सलग दुसऱ्यांदा विजय
युनायटेड क्लब तळावली संघाच्या रिझेला आल्मेदा हिला मानकरी पुरस्कार देतानाDainik Gomantak

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या महिला फुटबॉल लीगमध्ये शुक्रवारी युनायटेड क्लब तळावलीने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. नावेली येथील रोझरी मैदानावर त्यांनी एफसी वायएफए संघावर 4-0 फरकाने मात केली.

जोरदार पावसामुळे म्हापसा येथील धुळेर स्टेडियमच्या मैदानावर पाणी साचल्यामुळे एफसी गोवा आणि गतविजेते शिरवडे स्पोर्टस क्लब यांच्यातील सामना अर्धवट राहिला. तासाभराच्या खेळानंतर सामना स्थगित झाला तेव्हा दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. सामन्यातील उर्वरित वेळेतील खेळाबाबत गोवा फुटबॉल असोसिएशन निर्णय घेणार आहे.

युनायटेड क्लब तळावली संघाच्या रिझेला आल्मेदा हिला मानकरी पुरस्कार देताना
महान फिरकीपटू मुरलीधरनचा T20 मधील फिरकीपटूना मोलाचा सल्ला

तळावली संघाने मागील लढतीत कॉम्पॅशन FC चा आठ गोलने धुव्वा उडविला होता. FC YFA वरील विजयासह तळावली संघाचे आता तीन लढतीतून सहा गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थानावरील एफसी गोवास गाठले आहे. वायएफए संघाचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना होता.

मागील लढतीत पाच गोल केलेल्या कॅरेन एस्ट्रोसियो हिने दोन गोल केले. याशिवाय रिझेला आल्मेदा व स्टेसी कार्दोझ यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास वायएफए संघाची गोलरक्षक ॲनेट दा कॉस्ता व बचावपटू यांच्यातील गोंधळाचा लाभ उठवत कॅरेनने तळावली संघाने गोलखाते उघडले.

युनायटेड क्लब तळावली संघाच्या रिझेला आल्मेदा हिला मानकरी पुरस्कार देताना
महान फिरकीपटू मुरलीधरनचा T20 मधील फिरकीपटूना मोलाचा सल्ला

21 व्या मिनिटास जोसेल मस्कारेन्हास हिचा क्रॉस फटका अडविण्यास गोलरक्षक ॲनेटला अपयश आले, त्याचा लाभ उठवत कॅरेनने संघाची आघाडी भक्कम केली. सामन्याच्या 41 व्या मिनिटास रिझेला हिने तळावली संघची स्थिती 3-0अशी मजबूत केली. 82 व्या मिनिटास स्टेसीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com