गोवा: शिखाला कसोटी क्रिकेटचे वेध

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 30 मे 2021

भारतीय महिला संघ जून महिन्यात दीर्घ कालावधीत इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार असून शिखाची 21 सदस्यीय संघात निवड झाली आहे.

पणजी: गोव्याची (Goa) महिला क्रिकेट संघ कर्णधार शिखा पांडे (Shikha Pandey) हिला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे वेध लागले आहेत. भारतीय महिला संघ जून महिन्यात दीर्घ कालावधीत इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार असून शिखाची 21 सदस्यीय संघात निवड झाली आहे.

शिखाने रविवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर महिला क्रिकेट संघाची (Women's cricket team) वैयक्तिक पांढरी जर्सी प्रदर्शित केली. `माझ्या खेळण्याच्या साहित्य पेटीत मी सर्वप्रथम पांढरे जंपर-स्वेटर शोधते,` असा संदेश शिखाने कसोटी क्रिकेटच्या अनुषंगाने लिहिला आहे. (Goa Watching Test cricket at the Shikha Pandey)

यूईएफा चॅम्पियन्स लीगमध्ये चेल्सीची विजेतेपदावर मोहोर 

इंग्लंड दौऱ्यापूर्वी (Before the England tour) भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या विलगीकरणात आहे. इंग्लंड दौऱ्यात पहिला कसोटी सामना 16 ते 19 जून या कालावधीत खेळला जाईल. त्यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होईल.

शिखा वेगवान गोलंदाज असून 32 वर्षांची आहे. शेवटच्या वेळेस ती भारताकडून नोव्हेंबर 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेट सामना खेळली होती. तेव्हापासून भारतीय महिला संघही कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. शिखा एकूण दोन कसोटी क्रिकेट सामने खेळली आहे. इंग्लंडविरुद्ध 13 ते 16 ऑगस्ट 2014 या कालावधीत वॉर्मस्ले येथे झालेल्या लढतीत शिखाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या डावात इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाँट हिला पायचीत बाद करून तिने कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट प्राप्त केली. एकंदरीत तिने दोन कसोटीत चार गडी बाद केले आहेत. शिखाने 52 एकदिवसीय सामन्यांत 73, तर 50 टी-20 सामन्यांत 36 विकेट मिळविल्या आहेत.

 
 

संबंधित बातम्या