संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोव्याची विजयी सलामी

दमण-दीव संघावर 2-0 फरकाने मात करून पूर्ण तीन गुणांची कमाई केली. कॅल्विन बार्रेटो याने 32व्या मिनिटास पहिला गोल केला.
संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोव्याची विजयी सलामी
माजी विजेत्या गोव्याने (Goa) 75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल (Football) स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत विजयी सलामी दिली. Dainik Gomantak

पणजी: माजी विजेत्या गोव्याने (Goa) 75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल (Santosh Trophy National Football) स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत विजयी सलामी दिली. त्यांनी दमण-दीव संघावर 2-0 फरकाने मात करून पूर्ण तीन गुणांची कमाई केली. सामना बुधवारी गुजरातमधील एम. के. भावनगर विद्यापीठ मैदानावर झाला.

माजी विजेत्या गोव्याने (Goa) 75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल (Football) स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत विजयी सलामी दिली.
ISL Football: मुंबई सिटीचा सूर हरपलेल्या एफसी गोवावर विजय

कॅल्विन बार्रेटो (Calvin Barreto) याने 32व्या मिनिटास पहिला गोल केला. त्यामुळे विश्रांतीला गोव्याचा संघ एका गोलने आघाडीवर होता. नंतर 55व्या मिनिटास ज्योवियल डायस याच्या गोलमुळे गोव्याची आघाडी भक्कम बनली. त्यांच्या स्पर्धेतील पुढील सामना शुक्रवारी दादरा-नगर हवेली संघाविरुद्ध होईल.

दादरा-नगर हवेली संघाने बुधवारी सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात यजमान गुजरातला गोलशून्य बरोबरीत रोखून एका गुणाची कमाई केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com