National Senior Men's Kabaddi स्पर्धेत गोव्याने जिंकले 'ब्राँझ'

राष्ट्रीय सीनियर कबड्डी ः गोव्याची उपांत्य फेरीपर्यंत विक्रमी कामगिरी
Goa wins 'Bronze' in National Senior Men's Kabaddi Tournament
Goa wins 'Bronze' in National Senior Men's Kabaddi TournamentDainik Gomantak

पणजी: गोव्याच्या सीनियर पुरुष कबड्डी संघाने ओळीने पाच सामने जिंकत 69 व्या राष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र गतविजेता बलाढ्य रेल्वे संघ भारी ठरल्यामुळे त्यांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले, तरीही संघाची शानदार विक्रमी कामगिरी ऐतिहासिक ठरली. हरियाणातील चरखी दादरी येथे स्पर्धा झाली.

(Goa wins 'Bronze' in National Senior Men's Kabaddi Tournament)

Goa wins 'Bronze' in National Senior Men's Kabaddi Tournament
रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पातील तब्बल 1.60 लाखांचे लोखंड गेले चोरीला

राष्ट्रीय सीनियर पुरुष कबड्डी स्पर्धेत गोव्याने जिंकलेले हे पहिलेच पदक ठरले. अनुभवी रेल्वेचा संघ गोव्याला 40-20 असा भारी ठरला. त्यापूर्वी उपांत्यपूर्व लढतीत गोव्याने उत्तर प्रदेशला 41-38 असे तीन गुणांनी हरवून प्रथमच उपांत्य फेरी गाठली होती. अन्य एका उपांत्य लढतीत महाराष्ट्राने हरियाणास हरविले. गोवा आणि हरियानास संयुक्त तिसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत गोव्याला प्रो-कबड्डी प्रशिक्षक जसवीर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

गोव्यासाठी दुहेरी पात्रता

हरियानातील राष्ट्रीय सीनियर पुरुष कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे गोव्यासाठी दुहेरी पात्रता प्राप्त झाली. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गुजरातमध्ये होणाऱ्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी, तसेच यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तेलंगणात होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी गोव्याला पात्रता मिळाली आहे. गोमंतकीय कबड्डीसाठी हा दुग्धशर्करायोग असल्याचे गोवा कबड्डी संघटनेचे आश्रयदाते दत्ताराम कामत यांनी सांगितले.

Goa wins 'Bronze' in National Senior Men's Kabaddi Tournament
मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी वीस नौका जाम केल्या; 364 किलो मासळीचा लिलाव

गोव्याच्या मोहिमेतील यशस्वी शिलेदार

मोहित, श्रीकांत जाधव, नेहाल सावळ देसाई, देवेंद्र जोशी (कर्णधार), शिवम चौधरी, नितीन चंडेल, सुरेंद्र गिल, राहुल नागावत, साहिश गावडे, लक्ष्मण गावडा, शुभम कुमार, अनिल कुमार या 12 खेळाडूंनी 69 राष्ट्रीय सीनियर कबड्डी स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले.

प्रो-लीग कबड्डीसाठी गोमंतकीयांना संधी

सीनियर राष्ट्रीय स्पर्धा कबड्डी स्पर्धेत स्पृहणीय कामगिरी केलेल्या गोव्याच्या संघातील सर्व बाराही खेळाडू, तसेच अन्य तिघे मिळून एकूण 15 खेळाडूंना आगामी प्रो-लीग कबड्डीच्या लिलावात संधी मिळाली आहे. स्पर्धेच्या नवव्या मोसमाचा लिलाव येत्या सहा व सात ऑगस्ट रोजी मुंबईत होईल. ‘‘हरियानात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याच्या संघातील खेळाडूंनी शानदार खेळ केला. त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्याची प्रो-लीग कबड्डी आयोजकांनी घेतली. गोव्याच्या आणखी तिघा खेळाडूंनाही सामावून घेण्याची विनंती आम्ही प्रो-कबड्डी लीगचे अध्यक्ष्ष अनुपम गोस्वामी यांना केली. त्यांनी ती मान्य करून आकाश सिंग, ध्रुविक गोयल व आकाश बिबोलकर यांना लिलाव प्रक्रियेत सामावून घेतले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. यावेळच्या लिलावात गोव्याचे एकूण 15 कबड्डीपटू असतील. राज्यातील कबड्डीच्या प्रगती व विकासासाठी ही मोठी उपलब्धी आहे,’’ असे गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्ष रुक्मिणी कामत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com