गोव्याच्या महिला संघाची क्रिकेटमध्ये आगेकूच

3 षटकांत 3 बाद 36 धावा करून जिंकला सामना
Goa women cricket team in the forefront
Goa women cricket team in the forefrontDainik Gomantak

पणजी ः गोव्याच्या महिला व पुरुष संघाने 32 व्या राष्ट्रीय सीनियर टेनिस बॉल क्रिकेट (Cricket) स्पर्धेत आगेकूच राखली. नागपूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरी दाखल झाले.

गोव्याच्या महिलांनी उपउपांत्यपूर्व लढतीत तमिळनाडूस हरविले. तमिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांत 2 बाद 35 धावा केल्या. गोव्यातर्फे (goa) चैत्राली मेस्त्री व रतिका नाईक यांनी प्रत्येकी एक विकेट प्राप्त केली. 3 षटकांत 3 बाद 36 धावा करून गोव्याने सामना जिंकला.

Goa women cricket team in the forefront
गोव्याने वर्चस्व गमावले, उत्तर प्रदेशची 81 धावांची आघाडी

दिशा कांबळी हिने 10, तर रेहाना कामत हिने 8 धावा केल्या. बाद फेरीत गोव्यासमोर जम्मू-काश्मीरचे आव्हान असेल.

पुरुष गटातील उपउपांत्यपूर्व लढतीत गोव्याने पूर्वांचलला नमविले. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांत 4 बाद 73 धावा केल्या. नमेश काणकोणकरने 19, तर यश आनंद व अजय हळगेकर यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. नंतर पूर्वांचलचा डाव 6 षटकांत 6 बाद 33 असा रोखला गेला. गोव्यातर्फे प्रसाद सतरकरने 2 गडी बाद केले. गोव्याचा पुरुष संघही उपांत्यपूर्व लढतीत जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com