
Senior Womens T-20: तनया नाईक हिने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना अवघ्या 19 धावांत 6 विकेट टिपल्या, मात्र नंतर गोव्याची 6 बाद 26 धावा अशी दयनीय स्थिती झाली. निकिता मळीक हिने किल्ला लढविल्यामुळे अखेर हिमाचल प्रदेशवर दोन विकेट राखून रोमहर्षक विजय नोंदविता आला. सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सामना सोमवारी गुवाहाटी येथे झाला.
विजयासाठी 102 धावांचे लक्ष्य असताना गोव्याने बिनबाद 20 वरून सहा विकेट फक्त सहा धावांत गमावल्या. त्यामुळे संघ पराभवाच्या खाईत सापडला. अनुभवी निकिता हिने समयोचित फलंदाजी करताना 59 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 29 धावांची खेळी केली.
तिला श्रेया परब (17), पूर्वा भाईडकर (12), दीक्षा गावडे (नाबाद 8) या खेळाडूंचीही तोलामोलाची साथ लाभली. त्यामुळे गोव्याला 8विकेट गमावून विजय प्राप्त करता आला. त्यांचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय ठरला.
गोव्याची चौथी गोलंदाज
त्यापूर्वी, तनया नाईक हिने अफलातून मारा करताना हिमाचल प्रदेशला गारद केले. गोव्यातर्फे सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत डावात 5 गडी बाद करणारी ती चौथी गोलंदाजी ठरली. यापूर्वी शिखा पांडे, रुपाली चव्हाण, सुनंदा येत्रेकर यांनी प्रतिस्पर्धांच्या निम्मा संघ टिपण्याचा पराक्रम साधला होता.
संक्षिप्त धावफलक
हिमाचल प्रदेश : 37.1 षटकांत सर्वबाद 101(चित्रा सिंग जामवाल 24, नीना चौधरी 24, सोनल ठाकूर 22, मेताली गवंडर 5-1-23-1, निकिता मळीक 6-2-7-1, पूर्वा भाईडकर 7-3-19-1, तनया नाईक 10-3-19-6, श्रेया परब 2-0-7-0, सुनंदा येत्रेकर 4-1-10-0, दीक्षा गावडे 3.1-1-15-1) पराभूत
गोवा : 31.5 षटकांत 8 बाद 102(पूर्वजा वेर्लेकर 13, तेजस्विनी दुर्गड 2, सुनंदा येत्रेकर 0, तनया नाईक 3, निकिता मळीक नाबाद 29, संजुला नाईक 0, विनवी गुरव 0, श्रेया परब 17, पूर्वा भाईडकर 17, दीक्षा गावडे नाबाद 8, अनिशा अन्सारी 3-17, सुश्मिता कुमारी 2-28, निकिता चौहान 1-25).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.