Senior Womens T-20: गोव्याच्या महिलांची बिहारवर दणदणीत मात

बिहारवर 13 षटकांतच 9 विकेट राखून विजयी समारोप
purvaja Verlekar
purvaja VerlekarDainik Gomantak

Senior Womens T-20: गोव्याने सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेचा रविवारी विजयी समारोप केला. बिहारचा डाव अवघ्या 67 धावांत गुंडाळल्यानंतर त्यांनी 13 षटकांतच सामना नऊ गडी राखून जिंकला.

गुवाहाटी येथील अमिनगाव क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. सलामीची पूर्वजा वेर्लेकर हिने नाबाद 41 धावा करताना तनया नाईक (20) हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची अभेद्य भागीदारी केली.

त्यापूर्वी गोव्याच्या गोलंदाजांनी बिहारचा डाव 27 षटकांतच संपविला होता. गोव्याच्या महिलांचा हा सहा सामन्यांतील तिसरा विजय ठरला.

purvaja Verlekar
U19 Women's T20 WC: भारताच्या पोरी, जगात भारी! शफालीची टीम इंडिया विश्वविजेती, इंग्लंड फायनलमध्ये पराभूत

गोव्याला गटात चौथा क्रमांक

स्पर्धेच्या ड गटात गोव्याला प्रत्येकी तीन विजय व तीन पराभवांमुळे 12 गुणांसह चौथा क्रमांक मिळाला. उत्तराखंड व विदर्भाने 20 गुण प्राप्त करताना अनुक्रमे पहिला व दुसरा, हिमाचल प्रदेशने 16 गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. हैदराबाद व महाराष्ट्राचे प्रत्येकी आठ गुण झाले, त्यांना अनुक्रमे पाचवा व सहावा, तर सहाही सामने गमावलेल्या बिहारला शेवटचा सातवा क्रमांक मिळाला.

purvaja Verlekar
WPL 2023: ठरलं तर! मिताली दिसणार महिला आयपीएलमध्ये, 'या' संघाने दिली मोठी संधी

संक्षिप्त धावफलक

बिहार : 27 षटकांत सर्वबाद 67 (तेजस्वी 22, पी. प्रिया 10, मेताली गवंडकर 5-1-15-2, निकिता मळीक 5-2-12-2, पूर्वा भाईडकर 4-1-17-0, तनया नाईक 2-1-2-0, दीक्षा गावडे 7-4-12-3, सुनंदा येत्रेकर 4-2-7-1) पराभूत वि.

गोवा : 13 षटकांत 1 बाद 68 (पूर्वजा वेर्लेकर नाबाद 41, इब्तिसाम शेख 0, तनया नाईक नाबाद 20, रचना सिंग 1-16).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com