योगासन राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघाने एक रौप्य तर दोन कांस्य पदके पटकावली!

गोव्याने राष्ट्रीय योगासन स्पर्धेत द्वितीय उपविजेतेपद पटकावले.
योगासन राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघाने एक रौप्य तर दोन कांस्य पदके पटकावली!
Yogasana competition Dainik Gomantak

दाबोळी : (Dabolim) 11 ते 13 नोव्हेंबर 2021 या कालावधीत भुवनेश्वर ओडिशा येथे राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघातर्फे दुसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा (Traditional Yogasana) आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स महासंघातर्फे भुवनेश्वर येथे आयोजित योगासन स्पर्धेत (Yogasana competition) गोव्याच्या योगासन संघाने द्वितीय क्रमांक (Second runner-up) पटकावून चषक प्राप्त केला. याव्यतिरिक्त 1रजत (silver medal) व 2 कास्य पदकांची (Bronze medals) कमाई केली.

गोव्याच्या संघात (Goa team) 16 खेळाडूंचा समावेश होता आणि 6 अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात गोव्याचे प्रतिनिधित्व केले.यात आरिफ खान, आरुष गोवेकर, शौनक बाराजणकर, लक्ष्मी इलकल, नंदिनी धीमंण, सोहम पाटकर, रफिक करडगी, फरझीन झकाती, अशनी भट सरमळकर, निरल वाडेकर, मनस्वी दास, याशिका चेवसी, कामाक्षी धारवाडकर, रश्मी नावेलकर, रंजना गावकर, रश्मी बांदेकर या योग खेळाडूंनी भाग घेतला होता.

Yogasana competition
अष्टपैलू कौशल करणार गोव्याचे नेतृत्व..!

त्यांच्या बरोबर कोच दाऊलसाब वतार, विशाल गावस, स्नुषा गाबस, सुनीता नाईक, सुलोचना बाराजणकर (व्यवस्थापक) रोहित नाईक आदी उपस्थित होते. राष्ट्रीय स्पर्धा (National competition) पारंपारिक योगासन, कलात्मक एकल,कलात्मक जोडी, तालबद्ध जोडी, कलात्मक गट. अशा पाच गटात सब ज्युनियर आणि ज्युनियर बॉईज प्रकारात घेण्यात आली. या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 32 संघ सहभागी झाले होते आणि पात्रता फेरीत 1 लाखांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. 532 खेळाडूंनी ऑन साइट नॅशनलमध्ये भाग घेतला.

अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी या खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत आणि उपांत्य फेरीत ऑनलाइन पद्धतीने केलेली कामगिरी पाहता. नंतर प्रत्येक इव्हेंटमधील टॉप 10 खेळाडूंना ऑनसाइट राष्ट्रीय स्पर्धेसाठी आमंत्रित केले गेले. गोवा संघाने या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय उपविजेतेपदासह 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली.

निरल वाडेकर यांच्या कलात्मक एकेरीमध्ये एक कांस्य पदक ,कलात्मक गटातील एक रौप्य पदक विजेते सब ज्युनियर मुली मनस्वी दास, याशिका चेवली, आस्नी भट सरमळकर, निरल वाडेकर, कामाक्षी धारवाडकर कलात्मक गटात कांस्यपदक विजेता ज्युनियर मूली फरझीन झकाती, लक्ष्मी इलाकल, नंदीनी धीमान, रश्मी बंकर व संजना गावकर. पदकांसह एकूण 11 खेळाडूंनी इतर चार स्पर्धांमध्ये खेळाडूंनी चौथे स्थान पटकावले.

हॉकी ऑलिम्पियन दिलीप तिर्की यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.सागचे सहसचिव श्री संदेश बराझंकर, तांत्रिक टीम मॅनेजर सुलोचना बराझंकर. प्रशिक्षक दौलसाब वतार, विशाल गवस, स्नुषा गावस आणि सुनीता नाईक.आदींनी टीमसोबत काम केले आणि टीमचे लखी दास सहाय्यक कर्मचारी म्हणून काम केले.

Yogasana competition
Goa Police Cup Football स्पर्धेत पणजी फुटबॉलर्सचा उपांत्य फेरीत प्रवेश

गोव्यात आल्यावर संघाचे सरचिटणीस श्री. कमलेश बांदेकर, असोसिएशनचे सदस्य आणि पतंजली परिवार वास्को यांनी वास्को रेल्वे स्टेशन आणि दाबोळी विमानतळावर स्वागत केले.गोव्याच्या संघाचे वास्कोत रेल्वेतून दुपारी आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्थानकावर योग साधनेतील गुरु रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. रेल्वेस्थानकावरून खेळाडू बाहेर येतात त्यांचे पतंजलि परिवार मुरगाव तर्फे पुष्पहार घालून तसेच औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात तसेच त्यांना मिठाई वाटण्यात आली.

यावेळी पतंजलीचे सुरेश भोसले, संतोष केरकर, लक्ष्‍मण मांजरेकर, रसिका मोरजकर, अश्विनी पंडीत, मानसी परब, प्रभारी कमलेश बांदेकर, पतंजली प्रभारी विश्वास कोरगावकर आदी उपस्थित होते. साग चे कार्यकारी संचालक श्री व्हीएम प्रभुदेसाई यांनी खेळाडूंचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच साग चे श्री दत्तप्रसाद भोसले कोषाध्यक्ष, आणि श्री केशव मूर्ती उपाध्यक्ष तसेच असोसिएशन सदस्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com