Goa: यंग स्पोर्टस हॉकी क्लब विजेता

गोवन्स हॉकीचे (Hockey) अध्यक्ष झेवियर मार्किस यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
Goa: यंग स्पोर्टस हॉकी क्लब विजेता
विजेता क्लब Dainik Gomantak

पणजी:   यंग स्पोर्टस हॉकी क्लबने गोवा हॉकी प्रमोटर्स संघाचा 8-1 फरकाने धुव्वा उडवून गोवन्स हॉकीतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील हॉकी मैदानावर (Hockey ground) झाली. याच संघाने महिला गटातही बाजी मारली.

विजयी संघ पूर्वार्धाअखेरीस 3-1 फरकाने आघाडीवर होता. यंग स्पोर्टस हॉकी क्लबसाठी साहिल च्यारी याने दोन, हरी शेरपा याने तीन, तर फैझान खान, इन्नायत, बसंत यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. पराभूत गोवा हॉकी प्रमोटर्सचा एकमेव गोल रोहन यादवने केला.

 विजेता क्लब
'मोदी सरकारचे धोरणे देशाच्या एकात्मेसाठी धोकादायक'!

महिला गटातही यंग स्पोर्टस हॉकी क्लबने (Club) विजेतेपद मिळविताना नावेलीच्या इनोव्हॅशन्स संघाचा 6-0 फरकाने फडशा पाडला. विजयी संघासाठी निकिता नाईकने तीन, वीणा नाईकने दोन, तर पाविना हिने एक गोल केला.

गोवन्स हॉकीचे अध्यक्ष झेवियर मार्किस यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. इनासियो फर्नांडिस यांनी सूत्रसंचालन केले, तर मेल्शियर आलेमाव यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com