एसओपीनंतर गोव्यातील क्रिकेट सक्रिय

किशोर पेटकर
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

वैद्यकीय अधिकारीआरोग्यसुरक्षा अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

पणजी

देशांतर्गत क्रिकेट पूर्ववत सुरू करण्याच्या उद्देशाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शंभर पानी एसओपी (मानक परिचालन पद्धती) तयार केली आहेत्या अनुषंगाने आता गोवा क्रिकेट असोसिएशनही (जीसीए) सक्रिय झाले आहे. कोविड-१९ पार्श्वभूमीवर राज्यातील क्रिकेट सुरू करण्याबाबत राज्य संघटनेने पावले उचलले असून बीसीसीआयसोबत स्वतःची वेगळी एसओपी करण्यावर भर असेल.

जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी मंगळवारी सांगितलेकी ‘‘राज्यातील क्रिकेट सुरळीत करण्याच्या उद्देशाने आम्ही एसओपीचे पालन करणार आहोत. त्या उद्देशाने नियोजन करत असून मुख्य वैद्यकीय अधिकारीआरोग्यसुरक्षा अधिकारी यांची लवकरच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाईल. त्यांच्यासाठी सहाय्यकही नियुक्त असेल. एकंदरीत क्रिकेटपटूंचे आरोग्य सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने तीन सदस्यीय मंडळ कार्यरत असेल. संबंधित अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. वैद्यकीय अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर असेल.’’

साठ वर्षांवरील व्यक्तीस बीसीसीआयच्या एसओपीत प्रशिक्षण प्रक्रियेत प्रतिबंध आहे. त्या अनुषंगाने विपुल यांनी सांगितलेकी ‘‘जीसीएच्या क्रिकेट प्रशिक्षक व्यवस्थेत साठ वर्षांवरील व्यक्ती फारच कमी आहेत. एखाददुसरा असेलपण त्यांना नव्या प्रशिक्षण व्यवस्थेपासून दूर ठेवण्यात येईल. खेळाडूंचे आरोग्य आमच्यासाठी अतीव महत्त्वाचे आहे. त्यानुसार पुढील कार्यक्रम आखण्यात येईल. सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंनी नंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत सखोल अभ्यास करूनच एसओपी तयार करण्यात येईल.’’ कोरोना विषाणू महामारीमुळे गोव्याती मैदानावरील क्रिकेट यावर्षी मार्चच्या मध्यापासून ठप्प आहे.

 जीसीएचीही एसओपी...

विपुल यांनी सांगितलेकी ‘‘बीसीसीआयकेंद्र आणि गोवा सरकार यांच्या एसओपीचा सखोल अभ्यास करून जीसीए स्वतःची एसओपी तयार करेल. त्यानुसार खेळाडूंच्या सरावाचा शिष्टाचार असेल. जीसीएचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर सविस्तर सराव आराखडा तयार करतील. राज्य सरकारच्या परवानगीने खेळाडूंची कोविड-१९ संदर्भात चाचणी करण्यात येईल. सारे काही काटेकोरपणे हाताळले जाईल. खेळाडूंना एसओपीची सविस्तर माहिती मिळावीआरोग्यविषयक बाबींसदर्भात खेळाडू जागरूक असावेत यासाठी या महिन्यात वेबिनार घेतले जाईल.’’

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या