गोव्यातील आयर्नमॅनला ‘कोरोना’ची बाधा

किशोर पेटकर
सोमवार, 27 जुलै 2020

जलतरणसायकलिंगधावणे यांचा समावेश असलेली यंदाची स्पर्धा रद्द

पणजी : गतवर्षी गोव्यात प्रथमच झालेली आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा यंदा कोरोना विषाणू महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. २०२१ सालच्या उत्तरार्धात स्पर्धा घेण्याबाबत आयोजक प्रयत्नशील आहेत.

गोव्यात यंदा ८ नोव्हेंबरला आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा नियोजित होती. १.९ किलोमीटर समुद्रात खुले जलतरण९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे असे या स्पर्धेते स्वरूप आहे. कोविड-१९ मुळे स्पर्धकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना प्राधान्य देत गोव्यात यंदाची स्पर्धा घेणे अशक्य असल्याने आयोजकांनी गोवा आर्यर्नमॅन ७०.३ या वर्षी न घेण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीची माहिती स्पर्धेच्या अधिकृत फेसबुक पेजवर आहे. २०२१ सालच्या उत्तरार्धात स्पर्धा घेण्याबाबत सूचीत करण्यात आले आहे. गोव्यातील स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया मागील २४ मार्चला सुरू झाली होती.

गोव्यातील आयर्नमॅन स्पर्धेनंतर या वर्षी २८-२९ नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये होणारी जागतिक अजिंक्यपद आयर्नमॅन ७०.३ स्पर्धाही कोरोना विषाणू महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे.

गतवर्षी २० ऑक्टोबर रोजी मिरामार समुद्रकिनारी सुरू झालेल्या झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत देश-विदेशातील ॲथलिट्सचा प्रतिसाद लाभला होता. स्पर्धेचे यश पाहून आयोजकांनी यावर्षी नोव्हेंबरमध्ये स्पर्धा घेण्याचे निश्चित केले होतेत्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू होतीपण आता कोविड-१९ मुळे स्पर्धेत खंड पडत आहे. गतवर्षीच्या स्पर्धेत ९७९ स्पर्धकांनी भाग घेतला होतात्यापैकी ६६५ स्पर्धकांनी निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केली होती.

 

गतवर्षी बिश्वोर्जित विजेता

सेनादलाचा ॲथलिट बिश्वोर्जितसिंग सैखोम हा गतवर्षीच्या गोवा आयर्नमॅन स्पर्धेत विजेता ठरला होता. त्याने ४ तास ४२ मिनिटे व ४४ सेकंदात बाजी मारली होती. आयर्नमॅन स्पर्धेतील त्याचा तो पहिलाच किताब ठरला. महिला गटात स्वित्झर्लंडची नताशा बॅडमन विजेती ठरली होती. तिने ५ तास १८ मिनिटे व ४९ सेकंद वेळ नोंदविली होती.

संपादन - तेजश्री कुंभार 

 

संबंधित बातम्या