गोव्याच्या अर्चिता शिरोडकरला बेंच प्रेसमध्ये दोन 'सुवर्ण'

गोव्याच्या अर्चिता शिरोडकर (Archita Shirodkar) हिने राज्यासाठी गौरवशाली कामगिरी नोंदविताना अखिल भारतीय बेंच प्रेस स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली.
गोव्याच्या अर्चिता शिरोडकरला बेंच प्रेसमध्ये दोन 'सुवर्ण'
Archita ShirodkarDainik Gomantak

पणजी: गोव्याच्या अर्चिता शिरोडकर (Archita Shirodkar) हिने राज्यासाठी गौरवशाली कामगिरी नोंदविताना अखिल भारतीय बेंच प्रेस स्पर्धेत (All India Bench Press Competition) दोन सुवर्णपदके जिंकली. तिने सबज्युनियर मुलींच्या 63 किलो खालील दोन गटात अव्वल कामगिरी नोंदवून गोमंतकीयांतर्फे सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे.

राष्ट्रीय पातळीवरील बेंच प्रेस स्पर्धेत आपली ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे अर्चिता हिने सांगितले. यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत रौप्य, ब्राँझपदक जिंकले होते, पण सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अर्चिताने नमूद केले. इक्विप्ड आणि क्लासिक गटात ती प्रथम स्थानी राहिली वास्को येथील कोअर फिटनेस जिममध्ये ती सराव करते. अर्चिता १६ वर्षांची आहे.

Archita Shirodkar
पणजी फुटबॉलर्स अंतिम फेरीत

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी राष्ट्रीय पातळीवरील बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्णपदके जिंकलेल्या अर्चिताचे अभिनंदन केले आहे. ‘‘अर्चिताने गोव्यासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. उज्ज्वल भविष्यासाठी मी तिला शुभेच्छा देत आहे,’’ असे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन संदेशात नमूद केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com