नवोदितांना लक्ष वेधण्याची संधी; 25 वर्षांखालील वनडे स्पर्धेत गोव्याची सलामी रेल्वेशी

नवोदित क्रिकेटपटूंना छाप पाडण्याची संधी देणाऱ्या 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटातील गोव्याची (Goa) मोहीम 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
Players
PlayersDainik Gomantak

पणजी: नवोदित क्रिकेटपटूंना छाप पाडण्याची संधी देणाऱ्या 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटातील गोव्याची मोहीम 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पुदुचेरी (Puducherry) येथे पहिला सामना रेल्वेविरुद्ध होईल, त्यानंतर हरियाना, दिल्ली, राजस्थान, पंजाब या संघांविरुद्ध गोव्याचे (Goa) सामने होतील. प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्याने खेळाडूंचा कस लागणार हे स्पष्टच आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, 25 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नवोदितांना गोव्याच्या सीनियर संघाचे दार ठोठावण्याची संधी लाभेल. 25 वर्षांखालील स्पर्धा संपल्यानंतर सीनियर संघाची विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा 8 डिसेंबरपासून खेळली जाईल. या स्पर्धेत गोव्याचा ई गटात समावेश आहे. हल्लीच झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याने पाचपैकी दोन सामने जिंकले. त्यात माजी विजेत्या तमिळनाडूविरुद्धच्या विजयाचाही समावेश आहे.

Players
केपे मतदारसंघात मेगा फुटबॉल महोत्सवाची घोषणा!

टी-20 स्पर्धेत खेळलेला सुयश प्रभुदेसाई, निहाल सुर्लकर, वैभव गोवेकर, मोहित रेडकर यांचा 25 वर्षांखालील संघात समावेश आहे. प्रत्यक्ष टी-20 स्पर्धेत सुयश व निहाल खेळला होता. सुयशला गतमोसमात आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने करारबद्ध केले होते. त्याच्याकडून गोव्याला भरपूर अपेक्षा आहेत. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याच्या विजयात सुयशने नाबाद 43 धावा करताना शुभम रांजणे याच्यासमवेत 70 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 25 वर्षांखालील संघातील मंथन खुटकर, कश्यप बखले, आलम खान, वेदांत नाईक, बलप्रीत छड्डा, धीरज यादव, हेरंब परब, समित आर्यन मिश्रा, ऋत्विक नाईक या प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष असेल.

25 वर्षांखालील संघाचे माजी कर्णधार स्वप्नील अस्नोडकर फलंदाजीतील, तर रॉबिन डिसोझा गोलंदाजीतील प्रशिक्षक आहेत. ‘‘25 वर्षांखालील स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची असल्याचे खेळाडूंना बजावले आहे. विजय हजारे करंडक संघ निवडीसाठी ही कामगिरी विचाराधीन घेतली जाईल. नवोदितांना भावी कारकिर्दीसाठी 25 वर्षांखालील स्पर्धा दिशादर्शक निश्चितच आहे.’’

- विपुल फडके

सचिव गोवा क्रिकेट असोसिएशन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com