तिरंदाजी समितीवर गोव्याचे चेतन कवळेकर

किशोर पेटकर
गुरुवार, 23 जुलै 2020

चेतन कवळेकर हे राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शारीरिक शिक्षण आणि क्रीडा पुरस्काराचे मानकरी आहेत.

पणजी

भारतीय तिरंदाजी संघटनेने गोव्याचे चेतन कवळेकर यांची प्रशिक्षक समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. कवळेकर राष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष, तर गोवा हौशी तिरंदाजी संघटनेचे सचिव आहेत.
आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी रिकर्व्ह, कंपाऊंड, पॅरा आदी गटात भारतीय तिरंदाजी संघ प्रशिक्षकांची शिफारस कवळेकर यांची समिती करेल. यापूर्वी ते महासंघाच्या पुरस्कर्ते समितीचे समन्वयक, तर तांत्रिक समितीचे सदस्य होते.
चेतन कवळेकर हे राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शारीरिक शिक्षण आणि क्रीडा पुरस्काराचे मानकरी आहेत. ते उच्च माध्यमिक विद्यालय शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्षही आहेत.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या