गोव्याच्या क्रिकेटपटूंची तंदुरुस्ती आश्वासक

किशोर पेटकर
शनिवार, 25 जुलै 2020

खेळाडूंवर प्रशिक्षण संचालक व फिजिओंची ऑनलाईन नजर

पणजी 

गोव्यातील क्रिकेटपटू मार्च महिन्यापासून क्रिकेट मैदानापासून दूर असलेतरी गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) साऱ्या खेळाडूंवर ऑनलाईन माध्यमाद्वारे नजर ठेवून आहे. तंदुरुस्ती आणि सामर्थ्य याबाबत राज्यातील क्रिकेटपटूंची तयारी आश्वासक असल्याचे मत जीसीए क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांनी व्यक्त केले.

कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्यातील क्रिकेटपटू तंदुरुस्तीच्या अनुषंगाने सजग व्हावेत या हेतून मयेकर यांनी फिजिओ विवेक मिश्रा यांच्या मदतीने ऑनलाईन तंदुरुस्ती कार्यक्रम तयार केला. तेव्हापासून राज्याचे गतमोसमात प्रतिनिधित्व केलेले सीनियरवयोगटतसेच महिला क्रिकेटपटू या ऑनलाईन तंदुरुस्ती कार्यक्रमांतर्गत सक्रिय आहेतअसे मयेकर यांनी सांगितले.

ऑनलाईन तंदुरुस्ती आणि सामर्थ्य कार्यक्रमांतर्गत रणजी संघ क्रिकेटपटूंची पहिली चाचणी घेण्यात आली. त्यात बहुतांश क्रिकेटपटूंनी ९५ टक्के सक्षमता प्रदर्शित केली. ऑनलाईन चाचणीनंतर खेळाडूंना सूचना करण्यात आल्या आहेत. नंतर आणखी एक चाचणी घेण्यात येईलअशी माहिती मयेकर यांनी दिली. खांद्याची दुखापत व शस्त्रक्रिया यामुळे गतमोसम हुकलेल्या अष्टपैलू अमोघ देसाई यांनेही खूपच प्रगती साधली असून तो तंदुरुस्ती-सामर्थ्याच्या बाबतीत सज्ज झाला आहेअसे मयेकर यांनी नमूद केले. गतमोसमात कमी-जास्त प्रमाणात दुखापत झालेले आणखी काही क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या पुनर्वसनावर जीसीए लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. शारीरिक क्षमतासहनशक्तीतसेच यो-यो चाचणी आदी प्रत्यक्ष मैदानावरील सराव सुरू झाल्यानंतर घेण्यात येतीलअसेही मयेकर यांनी स्पष्ट केले.

देशातील क्रिकेटपटूंचा मैदानावरील सराव अजून सुरू झालेला नाही. कोविड-१९ परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच सरावास परवानगी मिळणार आहेतसेच महामारीमुळे देशांतर्गत क्रिकेट मोसमही यंदा लांबणीवर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जीसीएने आपल्या क्रिकेटपटूंना सध्या त्यांच्या घरीच तंदुरुस्तीविषयक ऑनलाईन उपक्रमात व्यस्त ठेवले आहे. मागील ८ एप्रिलपासून जीसीएने क्रिकेटपटूंचे ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिर सुरू केले होते.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या