गोव्यातील फुटबॉल अजून मागेच

किशोर पेटकर
शनिवार, 25 जुलै 2020

बंगाल अव्वलमहाराष्ट्रकेरळचीही विकास कामगिरीत छाप

पणजी

गोव्यातील फुटबॉल गुणवत्तेचे आणि खेळाडूंचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत असलेतरी फुटबॉलविषयक विकास कामगिरीत गोवा अजूनही मागेच आहे. त्यामुळेच त्यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या विकास कार्यक्रम क्रमवारीत पहिल्या तीन राज्यांत स्थान मिळाले नाही हे उघड आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने राज्यस्तरीय विकास कामगिरीअंतर्गत बंगालची उत्कृष्ट राज्य म्हणून निवड केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र व केरळला क्रमांक मिळाला आहे. फुटबॉल विकासासाठी संबंधित राज्याने केलेल्या कार्यवाहीनुसार क्रमवारी ठरविण्यात आली आहे. २०१९-२० मोसमातील कामगिरी निकषांच्या आधारे महासंघाने राज्यांची निवड केली.

या क्रमवारीत गोव्याला पहिल्या तीन राज्यांत स्थान मिळू शकले नाही. प्रशिक्षक शिक्षणग्रासरुट विकासई-प्रमाणपत्र अभ्यासक्रमएआयएफएफ अकादमी अधिस्वीकृती मान्यतारेफरी शिक्षण या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीनुसार राज्यांना गुण देण्यात आले. देशात सध्या महासंघाने पायाभूत फुटबॉल विकासावर भर दिला आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या