गोव्याचा जोश आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पंच

गोव्याचा जोश आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पंच
joash Mendonca

पणजी

चोडण येथील जोश मेंडोन्सा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पंच बनला आहे. असा मान मिळविणारा तो पहिला गोमंतकीय आहे.

राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केलेल्या जोश याने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची पंच परीक्षेत यश मिळविले. त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत पंचगिरी करण्यास पात्र ठरला आहे. त्याबद्दल त्याचे गोवा टेबल टेनिस संघटनेने अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत जोश गोव्याच्या संघातून खेळला आहे. शालेय-विद्यापीठ पातळीवर त्याने पदके जिंकली आहेत. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याने पंचगिरी केली आहे. यामध्ये गोव्यात झालेली ७९वी राष्ट्रीय कॅडेट-सबज्युनियर स्पर्धा, जम्मूत झालेली ८१वी राष्ट्रीय ज्युनियर-यूथ स्पर्धा, तेलंगणा येथे झालेली ८१वी सीनियर राष्ट्रीय स्पर्धा यांचा समावेश आहे. जोश सध्या डेकॅथलॉन स्पोर्टस इंडिया येथे कार्यरत आहे. 

संपादन- अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com