टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे पुरुष मानकरी!

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे पुरुष मानकरी!
CompetitionsDainik Gomantak

पणजी : गोव्याच्या पुरुष संघाने (Mens team) पूर्वांचल संघावर अटीतटीच्या लढतीत एका धावेने विजय नोंदवून 28 व्या फेडरेशन कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्पर्धा राजस्थानमधील दौसा येथे झाली.

स्पर्धेचा (Competitions) अंतिम सामना शुक्रवारी झाला. सामन्याच्या अखेरच्या षटकात पूर्वांचलला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती. श्रीराम मळीक याने शानदार गोलंदाजी करताना षटकात फक्त एकच धाव देत गोव्याला विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत गोव्याचा पुरुष संघ अपराजित राहिला. विजयी संघाचे नेतृत्व अजय हळगेकर याने केले, तर हरेश पार्सेकर यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.

अंतिम लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 5 बाद 44 धावा केल्या. अभिषेक गावकरने 23 धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल पूर्वांचलला 8 षटकांत 8 बाद 43 धावाच करता आल्या. गोव्याच्या आकाश भंडारीने 3, तर प्रसाद सतरकरने 2 गडी बाद केले. त्यापूर्वी, उपांत्य लढतीत गोव्याने उत्तर प्रदेशवर 12 धावांनी मात केली होती.

विजेत्या पुरुष संघाचे गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, खजिनदार अश्रफ पंडियाल, अबकारी कर खात्याचे अतिरिक्त आयुक्त संजीव गडकर यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेत गोव्याच्या महिला संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. छत्तीसगडने त्यांच्यावर विजय नोंदविला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com