महिला क्रिकेटमध्ये गोव्याची संमिश्र कामगिरी

महिला क्रिकेटमध्ये गोव्याची संमिश्र कामगिरी
sanjula naik

पणजी

देशांतर्गत क्रिकेटमधील गतमोसमात गोव्याची महिला क्रिकेटमधील कामगिरी संमिश्र ठरली. सीनियर महिलांनी एकदिवसीय स्पर्धेत साफ निराशा केलीतर टी-२० स्पर्धेत चांगला खेळ करताना विजयांची संख्या वाढविली. २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत जास्त सामने जिंकले.

गोव्याचा सीनियर महिला क्रिकेट संघ एकदिवसीय स्पर्धेत एलिट गटात खेळला. त्यांना आठपैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळविता आला. त्यामुळे संयुक्त अ-ब गटात गोव्याची १८ संघांत तब्बल १६व्या क्रमांकावर घसरण झाली. मात्र टी-२० स्पर्धेच्या ई गटात गोव्याच्या सीनियर महिलांनी उठावदार खेळ करताना सातपैकी चार सामने जिंकले.

विजयांच्या विचार करता२३ वर्षांखालील महिला संघाने समाधानकारक खेळ केला. एकदिवसीय स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्याच्या संघाने आठपैकी पाच सामने जिंकून गटात चौथा क्रमांक मिळविला. मात्र टी-२० स्पर्धेत सातपैकी दोन लढतीत विजय मिळविता आला.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात मात्र गोव्याकडून निराशा झाली. एकदिवसीय स्पर्धेत गोव्याला आठपैकी सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला. एलिट विभागातील संयुक्त अ-ब गटात १८ संघांत १७वा क्रमांक मिळाल्यामुळे गोव्यावर तळात राहण्याची नामुष्की आली. कोविड-१९ महामारी लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये १९ वर्षांखालील मुलींची टी-२० स्पर्धा होऊ शकली नाही.

संपादन - ्अवित बगळे

संजुलाची अष्टपैलू छाप

गोव्याची प्रतिभाशाली महिला क्रिकेटपटू संजुला नाईक हिने शानदार अष्टपैलू कामगिरीने लक्ष वेधले. तिने २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत १ शतक व ३ अर्धशतकांच्या मदतीने ८ सामन्यांत ५४.७१च्या सरासरीने ३८३ धावा केल्यातसेच १३ विकेट्सही मिळविल्या. संजुलाने सीनियर महिलांच्या टी-२० स्पर्धेतही चमक दाखविली. तिने ७ सामन्यांत ५०.२५च्या सरासरीने २ अर्धशतकांसह २०१ धावा केल्यायात नाबाद ९१ सर्वोच्च होत्या. शिवाय १० गडीही बाद केले. संजुलाने सीनियर महिलांच्या एकदिवसीय स्पर्धेत एका अर्धशतकासह १३३ धावातर २३ वर्षांखालील महिलांच्या टी-२० स्पर्धेत १२९ धावा करताना एक अर्धशतक नोंदविले. शिवाय तिने सहा विकेट्सही मिळविल्या.

गोव्याच्या महिला संघाची कामगिरी

स्पर्धा सामने विजय पराभव निकाल नाही

सीनियर वन-डे ८ १ ५ २

सीनियर टी-२० ७ ४ ३ ०

२३ वर्षांखालील वन-डे ८ ५ ३ ०

२३ वर्षांखालील टी-२० ७ २ ५ ०

१९ वर्षांखालील वन-डे ८ १ ६ १

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com