गोव्याचा एकमेव बुद्धिबळ ग्रँडमास्टर अनुरागची सहचारिणीही बुद्धिबळपटू!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

गोव्याचा पहिला आणि एकमेव बुद्धिबळ ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याने संसारातील सहचारिणीही याच खेळातील निवडली आहे. राज्यस्तरीय महिला विजेती नंधिनी सारिपल्ली हिच्याशी अनुरागने मडगाव येथे सात फेरे घेतले.

पणजी : गोव्याचा पहिला आणि एकमेव बुद्धिबळ ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याने संसारातील सहचारिणीही याच खेळातील निवडली आहे. राज्यस्तरीय महिला विजेती नंधिनी सारिपल्ली हिच्याशी अनुरागने मडगाव येथे सात फेरे घेतले.

 

अनुराग २५ वर्षांचा असून तीन वर्षांपूर्वी तो ग्रँडमास्टर बनला. त्याला २०१७ साली ग्रँडमास्टर, तर २०१३ साली इंटरनॅशनल मास्टर किताब फिडेकडून मिळाला. सध्या त्याचे २४९९ एलो गुण आहेत. नंधिनी व अनुराग एकत्रितपणे बुद्धिबळ खेळले आहेत. नंधिनीने गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्वही केले आहे. तिने २०१५ साली राज्यस्तरीय महिला स्पर्धा जिंकली होती. अनुराग, नंधिनी, तिचा भाऊ नीरज यांचा तिघांचा गोवनचेसट्रायो हा लोकप्रिय यूट्यूब चॅनेल आहे.

संबंधित बातम्या