Vinoo Mankad Trophy: गोव्याची पोरं लयचं भारी! अभिनंदनचा सोनेरी 'जलवा'

Vinoo Mankad Trophy: गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी दणदणीत विजय नोंदविला.
Abhinandan Thakur
Abhinandan ThakurDainik Gomantak

पणजी: गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी दणदणीत विजय नोंदविला. त्यांनी क गट लढतीत मेघालयावर आठ विकेट राखून मात केली. सामना पुण्यातील डी. वाय. पाटील अकादमी मैदानावर झाला.

दरम्यान, गोव्याने (Goa) नाणेफेक जिंकून मेघालयास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मृणाल दास (५३) व कर्णधार भाराली (६५) यांच्या अर्धशतकांमुळे मेघालयास १०८ धावांची दमदार सलामी मिळाली. मात्र नंतर अभिनंदन ठाकूरच्या (Abhinandan Thakur) प्रभावी डावखुऱ्या फिरकीमुळे गोव्याने सामन्याचे पारडे फिरवले. अभिनंदनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक जीवनकुमार चित्तेम याने मृणालला यष्टिचीत बाद केल्यानंतर मेघालयास (Meghalaya) धावगती वाढविता आली नाही. अभिनंदनने चार गडी बाद करत त्यांना ७ बाद १८० धावांत रोखले.

Abhinandan Thakur
Ranji Trophy 2022 Final: शुभम शर्माने झळकावले शानदार शतक, पाहा कसे मारले 15 चौकार

दुसरीकडे, अर्धशतकवीर देवनकुमार चित्तम (५५) याचे अर्धशतक, तसेच सनथ नेवगी (४२) व कर्णधार दीप कसवणकर (३२) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर गोव्याने ३३.२ षटकांत २ बाद १८१ धावा करून सामना जिंकला. देवनकुमार व त्याचा सलामीचा साथीदार शोएब शेख यांना फलंदाजी करताना दुखापत झाल्यामुळे निवृत्त व्हावे लागले.

Abhinandan Thakur
Ranji Trophy 2022: सर्फराजने रचला इतिहास, असे करणारा ठरला दुसरा फलंदाज

संक्षिप्त धावफलक

मेघालय ः ५० षटकांत ७ बाद १८० (मृणाल दास ५३, भाराली ६५, शाव्हियन ३६, पुंडलिक नाईक ७-०-३८-०, प्रज्ञेश गावकर ८-०-३१-०, नमेश काणकोणकर ९-०-३२-१, दीप कसवणकर १०-२-२७-०, अभिनंदन ठाकूर १०-०-३५-४, देवनकुमार चित्तेम ६-०-१६-१) पराभूत वि. गोवा ः ३३.२ षटकांत २ बाद १८१ (देवनकुमार चित्तेम जखमी निवृत्त ५५, शोएब शेख जखमी निवृत्त २६, आर्यन नार्वेकर ७, सनथ नेवगी ४२, दीप कसवणकर नाबाद ३२, वर्धन मिस्कीन नाबाद १२, भारत १-२६, राघव १-४४).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com