Jumping Jacks मध्ये गोव्याच्या यश पवारचा पराक्रम

एका मिनिटात 107 Jumping Jacks चा विक्रम मोडत यश ने केले तब्बल 129 Jumping Jacks
Jumping Jacks Yash Pawar with Minister Goving Gawade and Honorable
Jumping Jacks Yash Pawar with Minister Goving Gawade and HonorableDainik Gomantak

पणजी: गोव्याच्या यश पवार (Jumping Jacks Yash Pawar) याने जंपिंग जॅक्स (Jumping Jacks) या क्रीडा प्रकारात विक्रमी कामगिरी नोंदविली. त्याने एका मिनिटात जास्तीत जास्त जंपिंग जॅक्स नोंदविण्याचा पराक्रम केला.

Jumping Jacks Yash Pawar with Minister Goving Gawade and Honorable
Goa: एथनचा ऑनलाईन बुद्धिबळातील वरचष्मा कायम

प्राप्त माहितीनुसार, यश याने एका मिनिटांत 129 जंपिंग जॅक्सची नोंद केली. यापूर्वीचा विक्रम 107 जंपिंग जॅक्सचा होता. तसेच यशने 10 सेकंदांत 24 जंपिंग जॅक्स करून अमेरिकेच्या जेफ गोल्डबर्ज याने केलेला 10 सेकंदातील 20 जंपिंग जॅक्सचा विक्रम मागे टाकला. जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी प्रदर्शित केल्याबद्दल यश पवार याचे राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कौतुक केले असून त्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

Jumping Jacks Yash Pawar with Minister Goving Gawade and Honorable
Masters Badminton: संध्या, अमित, विशाल, वामन, विल्सनची घोडदौड

यश पवार हा अष्टपैलू आहे. त्याने रायफल शुटिंग खेळात गोव्याचे अकरा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय जलतरण आणि डायव्हिंग खेळातही त्याने राज्य पातळीवर बक्षिसे जिंकली आहेत. वयाच्या सातव्या व आठव्या वर्षी त्याने दोन वेळा मांडवी नदी पोहून पार करण्यात यश प्राप्त केले होते. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील ‘परीक्षा पे चर्चा’ या खास कार्यक्रमात भाग घेण्यासाठी यशची निवड करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com