गोलरक्षक आल्बिनोवर दुखापतीचा ‘गोल’

Dainik Gomantak
रविवार, 31 मे 2020

दुखापतीमुळे आल्बिनोस २०१७-१८ मधील बाकी मोसमास मुकावे लागले. त्यानंतर पुढील मोसम संघर्ष करण्यातच गेला.

पणजी

काही वर्षांपूर्वी ऐजॉल एफसीच्या आय-लीग विजेतेपदाचा शिल्पकार ठरलेला गोव्याचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याच्या कारकिर्दीवर दुखापतीने गोल’ केला. त्यामुळे या २६ वर्षीय गोलरक्षकास फटका बसला.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दुखापतीमुळे बाजूस गेलेल्या आल्बिनोने नव्या मोसमातसाठी केरळा ब्लास्टर्सशी करार केला आहे. कारकीर्द पुन्हा उंचावण्याची अपेक्षा तो बाळगून आहे. ९ जूनपासून त्याचा करार प्रत्यक्षात येईल.

गोव्यातील साळगावकर एफसीकडून कारकिर्दीस सुरवात केलेल्या आल्बिनोने आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटी एफसीचे प्रतिनिधित्व केले. तेथून तो लोनवर ऐजॉल एफसीतर्फे खेळला. त्यानंतर दिल्ली डायनॅमोज संघाने २०१७-१८ मोसमात करारबद्ध केले. त्या मोसमात दिल्ली संघाकडून सलग चार सामने खेळल्यानंतर आल्बिनोला दुखापतीस सामोरे जावे लागेल.

दुखापतीमुळे आल्बिनोस २०१७-१८ मधील बाकी मोसमास मुकावे लागले. त्यानंतर पुढील मोसम संघर्ष करण्यातच गेला. दिल्ली डायनॅमोजचे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांनी गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याच्यावर जास्त विश्वास दाखविला. गतमोसमात दिल्ली डायनॅमोजचे ओडिशा एफसी नामकरण झाले. २०१९-२० मोसमापूर्वी दुखापतीने डोके वर काढल्यामुळे आल्बिनो एकही आयएसएल सामना खेळू शकला नाही. मागील तीन मोसमात तो मोजून फक्त आठच आयएसएल सामन्यात मैदानावर दिसला.

यशस्वी मोसमपण...

मिझोरामच्या ऐजॉल एफसीने २०१६-१७ मोसमात आय-लीग स्पर्धा जिंकली. त्यात आल्बिनोच्या कामगिरीचा मोठा वाटा राहिला. सर्व १८ सामन्यांत त्याने ऐजॉलचे प्रतिनिधित्व केले. त्या मोहिमेतील आठ सामन्यांत आल्बिनोने एकही गोल स्वीकारला नव्हता. त्या यशानंतर कारकीर्द योग्य दिशेने जात असतानादुखापतीने या गुणवान गोलरक्षकाची संधी हिरावली.

संबंधित बातम्या