श्रृंगी, संजना, झेवियर, झिदानचे जलतरणात यश

बंगळूर येथे कर्नाटक जलतरण संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत गोमंतकीय जलतरणपटूंनी पदके जिंकली.
श्रृंगी, संजना, झेवियर, झिदानचे जलतरणात यश
श्रृंगी, संजना, झेवियर, झिदानचे जलतरणात यशDainik Gomantak

पणजी: बंगळूर येथे कर्नाटक जलतरण संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत गोमंतकीय जलतरणपटूंनी पदके जिंकली. श्रृंगी बांदेकर, संजना प्रभुगावकर, झेवियर डिसोझा व झिदान सय्यद यांनी एकत्रितपणे 15 पदकांची कमाई केली. गोव्यातील चारही जलतरणपटू बंगळूरस्थित गॅफरे ॲक्वेटिक सेंटर येथील नियमित प्रशिक्षणार्थी आहेत.

झेवियर याने एक रौप्य व दोन ब्राँझपदके जिंकली. झिदानला एक सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळाले. श्रृंगीने दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली, तर संजनाने एक सुवर्ण, एक रौप्य व तीन ब्राँझपदके जिंकली.

श्रृंगी, संजना, झेवियर, झिदानचे जलतरणात यश
IPL 2021: ...म्हणून सोडले कर्णधारपद, विराटचे स्पष्टीकरण

झेवियर, झिदान, श्रृंगी, संजना यांना गॅफरे ॲक्वेटिक सेंटरमध्ये जलतरण प्रशिक्षक भूषण कुमार यांचे, तसेच सहाय्यक प्रशिक्षक भास्कर कुमार व आर. गुरुप्रसाद यांचे मार्गदर्शन लाभते. कर्नाटक जलतरण स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे गोव्यातील चारही जलतरणपटू आगामी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.बंगळूर येथे झालेल्या जलतणर स्पर्धेत पदके जिंकलेले गोमंतकीय जलतरणपटू झिदान सय्यद, संजना प्रभुगावकर, श्रृंगी बांदेकर, झेवियर डिसोझा यांच्यासमवेत मुख्य प्रशिक्षक भूषण कुमार, सहाय्यक प्रशिक्षक आर. गुरुप्रसाद, भास्कर कुमार.

Related Stories

No stories found.