या माजी क्रिकेटपटूने मुलाच्या बुटाची लेस बांधण्यासाठी थांबवली पत्रकार परिषद

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

ग्रॅमी स्मिथ पत्रकारांशी संवाद साधत होते, पण मुलाने त्यांना हा संवाद थांबवत आपल्या बुटाची लेस बांधण्यास भाग पाडले.

जोहान्सबर्ग :  दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेबाबत दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रॅमी स्मिथ पत्रकारांशी संवाद साधत होते, पण मुलाने त्यांना हा संवाद थांबवत आपल्या बुटाची लेस बांधण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील महिला क्रिकेट मालिकेबाबत स्मिथ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते, पण अचानक त्यात व्यत्यय आला. स्मिथ यांचे लक्ष वेगळीकडेच वेधले गेले होते. त्यांचा मुलगा खेळण्यातील बॅट घेऊन त्यांच्याकडे आला होता.

रंगतदार लढतीत ओडिशाला रोखून एका बंगळूर एफसीची गुणाची कमाई

 

स्मिथ यांनी पत्रकार परिषदेत व्यत्यय आणल्याबद्दल माफी मागितली, पण लगेच मुलाच्या बुटाची लेस बांधत होतो, पित्याचे काम प्रथम, अशी टिप्पणी केल्यावर एकच हशा झाला. त्यांची ही टिप्पणी समाजमाध्यमांवर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेला ग्रॅमी स्मिथ 2019 मध्ये दुसऱ्यांदा विवाहबंधात अडकला होता. 2015 मध्ये त्याने आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. स्मिथने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. स्मिथ हा दक्षिण अफ्रिकेचा सर्वात युवा कर्णधार आहे. 2015 मध्ये घटस्फोट घेतला. 

आयएसएल : जमशेदपूरची हैदराबादशी गोलशून्य बरोबरी

स्मिथने दक्षिण आफ्रिका संघाचं 117 कसोटी सामन्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे. 277 ही स्मिथची कसोटी क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या आहे. स्मिथने 197 वन डे सामन्यात 6989 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मिथच्या नावावर 37 शतके आहेत. सध्या तो दक्षिण अफ्रिका क्रिकेटचा संचालक म्हणून कार्यरत आहे. 

 

संबंधित बातम्या