मुष्टिफंडच्या बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर्स

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

मुष्टिफंड विद्यालय पालक-शिक्षक संघाच्या लेफ्टनंट कमांडर गोपाळ सखाराम सुखटणकर स्मृती ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. दरवर्षी खेळली जाणारी स्पर्धा यंदा कोविड-१९मुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शनिवारी संध्याकाळी सुरू झाली.

पणजी : मुष्टिफंड विद्यालय पालक-शिक्षक संघाच्या लेफ्टनंट कमांडर गोपाळ सखाराम सुखटणकर स्मृती ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. दरवर्षी खेळली जाणारी स्पर्धा यंदा कोविड-१९मुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शनिवारी संध्याकाळी सुरू झाली.

भारतातील विविध राज्ये, तसेच अमेरिका, श्रीलंका, मेक्सिको या देशातील मिळून दोनशेहून अधिक बुद्धिबळपटूंचा स्पर्धेत सहभाग आहे. ग्रँडमास्टर खेळाडूंत भारताचे जी. ए. स्टॅनी, आर. आर. लक्ष्मण, हिमांशू शर्मा, तसेच मेक्सिकोचा इबारा लुईस फर्नांडो यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त १४ इंटरनॅशनल मास्टर, चार फिडे मास्टर व एका वूमन कँडिडेट मास्टर खेळाडूचा समावेश आहे. 

मुष्टिफंड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अपर्णा च्यारी यांच्या हस्ते स्पर्धेचे संस्थेच्या कुजिरा येथील संकुलात औपचारिक उद्‍घाटन झाले. यावेळी स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, स्पर्धा समन्वयक दत्ताराम पिंगे, पालक-शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष पल्लवी काकोडकर, सचिव बोनिता रॉड्रिग्ज व सदस्यांची उपस्थिती होती

संबंधित बातम्या