मनोहर पर्रीकर बुद्धिबळ स्पर्धेस ग्रँडमास्टर्सचा प्रतिसाद

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या श्री. मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या अ विभागात ग्रँडमास्टर खेळाडूंचा प्रतिसाद लाभत आहे.

पणजी:  गोवा बुद्धिबळ संघटनेच्या श्री. मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या अ विभागात ग्रँडमास्टर खेळाडूंचा प्रतिसाद लाभत आहे. देशविदेशातील खेळाडूंना या स्पर्धेने आकर्षित करण्यास सुरवात केली आहे. पंधरा फेऱ्यांची स्पर्धा दोन ऑक्टोबरला खेळली जाईल.

स्पर्धेसाठी दाखल झालेल्या १९८ प्रवेशिकांत उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव (फिडे रेटिंग २५५७), इस्त्राईलचा ग्रँडमास्टर नित्झान स्टेनबर्ग (२५५४), भारतीय ग्रँडमास्टर दिप्तयन घोष (२५४१), अझबैजानचा ग्रँडमास्टर व्हुगार रासुलोव ((२४७८), इराणचा ग्रँडमास्टर होमायून तौफिघी (२४३९) यांचा समावेश आहे. 

याशिवाय अकरा इंटरनॅशनल मास्टर खेळाडूंनी नोंदणी केली असून यामध्ये गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदी (२३७८) याचाही सहभाग आहे. गोव्याचा फिडे मास्टर नीतिश बेलुरकर (२३५१) सुद्धा या स्पर्धेत खेळेल. इंडोनेशिया, रशिया, युक्रेन, आयर्लंड, अर्जेंटिना या देशातील बुद्धिबळपटूंनीही प्रवेशिका सादर केलेली आहे.

यापूर्वी स्पर्धेची ब, क गट स्पर्धा झालेली आहे. अ गट स्पर्धेत २००० एलोपेक्षा जास्त मानांकन असलेले खेळाडू खेळणार असल्याने ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली 
जाते.
 

संबंधित बातम्या