पांड्या बंधूंकडून कोरोनाकाळात मोठी मदत; क्रिकेट जगताकडून मदतीचा ओघ सुरूच 

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा देशाला वाईट परिणाम झाला आहे.

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा देशाला वाईट परिणाम झाला आहे. ऑक्सिजन अभावी बर्‍याच लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या कुटुंबीयांनी ग्रामीण भागासाठी 200 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देण्याचे ठरविले आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एक कोटी तर आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) फ्रँचायझींने 2.50 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अष्टपैलू हार्दिक आणि त्याचा भाऊ क्रुणाल पांड्या(Pandya Brothers) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघाकडून खेळतात. आताही ते स्पर्धा खेळत आहेत. शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या (CSK) सामन्याआधी हार्दिक 200 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणगी स्वरूपात देण्याचे ठरवले आहे. (Great help from the Pandya brothers in the Corona period; The flow of help from the cricket world continues)

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादने केला मध्यातच मोठा बदल जाणून घ्या

हार्दिकच्या आईने घेतला मदतीचा निर्णय 
ग्रामीण भागासाठी 200 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देण्याचे ठरविले आहे असे हार्दिक म्हणाला. पुढे हार्दिक म्हणाला माझा म्हणणं आहे ग्रामीण भागात वैद्यकीय पायाभूत सुविधांची मोठी गरज आहे. आपल्या देशातील परिस्थिती आपल्याला सर्वांना चांगली माहिती आहे. या स्थितीत कोरोनाशी लढा देणारा प्रत्येकजण, फ्रंट लाइन कामगार, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांसह. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत परिस्थिती पाहून, कृणाल, मी आणि विशेषतः माझ्या आईने आम्हाला काही मदत करण्याचा सल्ला दिला. 

मिशन ऑक्सिजनने दिली माहिती  
सचिन तेंडुलकर कडून 1 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे अशी माहिती मिशन ऑक्सिजन संस्थेने सोशल मीडियावर दिली. ही संस्था 250 हून अधिक तरुण उद्योजकांची बनलेली आहे. हे परदेशातून ऑक्सिजन कंसनट्रेटर आयात करीत आहे आणि  रुग्णालयात पुरवित आहे. सचिनने सोशल मीडियावरही या संस्थेची माहिती दिली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने दिल्ली एनसीआरची (NCR) स्वयंसेवी संस्था हेमकुंट फाउंडेशन आणि उदय फाउंडेशनला दीड कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या संस्था ऑक्सिजन सिलिंडरपासून कोरोनावरील उपचारापर्यंत इतर वैद्यकीय उपकरणे पुरवण्याचे काम करतात.

संबंधित बातम्या