Shubman Gill Century
Shubman Gill CenturyDainik Gomantak

Shubman Gill Century: गिलनं जिंकलं लाखोंचं दिल! IPL 2023 मध्ये तिसरी सेंच्युरी ठोकत रचला इतिहास

आयपीएल 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्या गुजरात टायटन्सच्या शुबमन गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी केली आहे.

Shubman Gill 3rd IPL Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी (26 मे) दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरातचा युवा खेळाडू शुभमन गिलने शतकी खेळी केली आहे.

गिलेने या सामन्यात 49 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारासह त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएल 2023 स्पर्धेतील तिसरे शतक ठरले आहे. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांविरुद्ध शतकी खेळी केली होती.

गिल गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे तो गुजरात टायटन्सचा एकमेव शतकवीर आहे.

Shubman Gill Century
Virat Kohli, Shubman Gill Century: गिलचे विराटच्या पावलावर पाऊल! एकाच सामन्यात दोघांचाही 'सेम टू सेम' रेकॉर्ड

एकाच हंगामात 3 शतके

गिल एकाच आयपीएल हंगामात तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा तिसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि जॉस बटलर यांनी असा कारनामा केला आहे. विराटने 2016 आयपीएल हंगामात 4 शतके केली होती. तसेच बटलरने 2022 आयपीएल हंगामात 4 शतक केली होती.

सर्वात कमी वयात शतक

गिल हा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वात कमी वयात शतकी खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 23 वर्षे 260 दिवस वय असताना हे शतक केले आहे. त्याने मुरली विजयचा विक्रम मागे टाकला आहे. मुरली विजयने 28 वर्षे 54 दिवस वय असताना चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्लेऑफमध्ये शतक केले होते.

आयपीएल प्लेऑफमध्ये कमी वयात शतक करणारे खेळाडू

  • 23 वर्षे 260 दिवस - शुभमन गिल (गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2023)

  • 28 वर्षे 54 दिवस - मुरली विजय (चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2012)

  • 28 वर्षे 358 दिवस - रजत पाटिदार (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 2022)

Shubman Gill Century
IPL 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की! Video ने उडवली खळबळ

गिलच्या 800 धावाही पार

गिलने आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा देखील केल्या आहेत. गिलने 800 धावांचा टप्पा या हंगामात पार केला आहे. त्याने फाफ डू प्लेसिसला या यादीत मागे टाकले आहे. फाफ डू प्लेसिसने 14 सामन्यांमध्ये 8 अर्धशतकांसह 730 धावा केल्या आहेत.

त्यामुळे गिल एका आयपीएलमध्ये हंगामात 800 धावांचा टप्पा पार करणारा एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांनी असा कारनामा केला आहे. विराटने 2016 मध्ये 973 धावा, वॉर्नरनेही 2016 मध्ये 848 धावा केल्या होत्या. तसेच जॉस बटलरने 2022 मध्ये 863 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com