गार्डियन एंजलने वास्कोला नमविले

20 वर्षांखालील तासा गोवा लीग फुटबॉल (Goa League Football) स्पर्धेत पूर्ण गुणांची कमाई केली.
गार्डियन एंजलने वास्कोला नमविले
FootballDainik Gomantak

पणजी: गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने (Guardian Angel Sports Club) वास्को स्पोर्टस क्लबला (Vasco Sports Club) 4-2 फरकाने नमवून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या 20 वर्षांखालील तासा गोवा लीग फुटबॉल (Goa League Football) स्पर्धेत पूर्ण गुणांची कमाई केली. सामना शुक्रवारी धर्मापूर येथील मैदानावर झाला.

सामन्याच्या पाचव्याच मिनिटास गार्डियन एंजल क्लबने आघाडी घेतली. नंतर 18 व्या मिनिटास जॉन्सन होर्ता याने गोल नोंदवून संघाची आघाडी वाढविली. 40 व्या मिनिटास जोशुआ डिसिल्वाच्या गोलमुळे वास्कोने पिछाडी एका गोलने कमी केली. विश्रांतीपूर्वी जॉयविन कॉस्ताने गोल करून गार्डियन एंजलची आघाडी 3-1 अशी भक्कम केली. चिराग म्हार्दोळकरने 71 व्या मिनिटास वास्कोची पिछाडी 2-3 अशी कमी केली. 90+1 व्या मिनिटास जॉन्सन होर्ता याने गोल नोंदवून गार्डियन एंजलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Football
पणजी फुटबॉलर्स अंतिम फेरीत

शिरसई येथे स्पर्धेतील आणखी एका सामन्यात सेझा फुटबॉल अकादमीने साळगावकर एफसीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. दोन्ही गोल सामन्याच्या उत्तरार्धात झाले. आदित्य तलवारने 60 व्या मिनिटास सेझा अकादमीस (Seza Academy) आघाडी मिळवून दिल्यानंतर 68 व्या मिनिटास शुभम शिरवईकर याने साळगावकर एफसीला बरोबरी साधून दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com