गोव्याच्या ‘पाहुण्या’ क्रिकेट प्रशिक्षकांचा ठसा

गोव्याच्या ‘पाहुण्या’ क्रिकेट प्रशिक्षकांचा ठसा
Coach

किशोर पेटकर

पणजी

 गोवा क्रिकेट असोसिएशनने रणजी क्रिकेट मोसमातील मागील काही मोसमांत पाहुण्या प्रशिक्षकांना प्राधान्य दिले. त्यात दोड्डा गणेशह्रषीकेश कानिटकर हे भारताचे माजी कसोटीपटूतसेच श्रीलंकेचे माजी कसोटी वेगवान गोलंदाज नुवान झोयसा यांनी ठसा उमटविल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

पाहुण्या रणजी संघ प्रशिक्षकांत कर्नाटकचे माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश सर्वाधिक यशस्वी ठरले आहेत. २००७-०८२००८-०९२०१२-१३ व २०१९-२० अशा चार मोसमात मिळून २९ सामने ते गोव्याच्या प्रशिक्षकपदी होतेत्यात ११ विजय नोंदविताना गोव्याला २००८-०९ मध्ये प्लेट गटाची उपांत्य फेरीतर २०१९-२० मध्ये रणजी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून देण्यास मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१२-१३ मोसमात गोव्याचे सर्व आठही सामने अनिर्णित राहिले होते. २०१९-२० मोसमात गोव्याने ७ सामने जिंकलेहे यश प्लेट गटात मिळाले.

श्रीलंकेचे नुवान झोयसा यांची कारकिर्दही उल्लेखनीय ठरली. २०१३-१४ व २०१४-१५ असे सलग दोन मोसम ते गोव्याचे प्रशिक्षक होते. त्यापैकी पहिल्या मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने चार सामने जिंकले होते. त्या मोसमात गोव्याला बाद फेरी थोडक्यात हुकली होती.

महाराष्ट्राचे ह्रषीकेश कानिटकर २०१५-१६ मोसमात गोव्याचे प्रशिक्षक होते. त्यांचेही मार्गदर्शन गोव्यासाठी प्रेरक ठरले. त्या मोसमात गोव्याने आठपैकी सहा सामने अनिर्णित राखले.

कर्नाटकचे माजी रणजीपटू राजेश कामत यांनी दोन मोसम गोव्याच्या रणजी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. २००९-१० व २०१०-११ असे दोन मोसम ते गोव्याचे प्रशिक्षक होते. त्यांच्या कार्यकाळातील पहिल्या मोसमात गोव्याने सर्व पाचही सामने अनिर्णित राखले होते.

२००७-०८ पासून पाहुण्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे गोव्याने १७ विजय नोंदविले८ पराभव पत्करले तर ३८ सामने अनिर्णित राखले.

गोव्यातील प्रशिक्षकांचे पराभव जास्त

तुलना करतागोव्यातील प्रशिक्षकांना जास्त पराभवांना सामोरे जावे लागले. २००५-०६ व २००६-०७ असे दोन मोसम गोव्याचे माजी रणजीपटू नामदेव फडते संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या कार्यकाळात गोव्याचा संघ १० सामने खेळलाएकही विजय मिळाला नाहीपण ७ सामने गमावले. प्रकाश मयेकर यांनी २०१६-१७२०१७-१८२०१८-१९ असे तीन मोसम गोव्याचे प्रशिक्षकपद सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने २४ सामन्यांत २ विजय१२ पराभव आणि १० अनिर्णित अशी कामगिरी बजावली. विवेक कोळंबकर २०११-१२ या एका मोसमात प्रशिक्षक होते. तेव्हा गोव्याने पाच सामन्यांत १ विजय२ पराभव व २ अनिर्णित नोंद केली होती.

गोव्याचे पाहुणे प्रशिक्षक (२००७-०८ पासून)

प्रशिक्षक सामने विजय पराभव अनिर्णित

दोड्डा गणेश २९ ११ २ १६

नुवान झोयसा १६ ४ ४ ८

राजेश कामत १० १ १ ८

ह्रषीकेश कानिटकर ८ १ १ ६

एकूण ६३ १७ ८ ३८

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com