U-25 CK Nayudu Trophy: गोव्याच्या गोलंदाजांवर गुजरातचे वर्चस्व; अर्धशतकांचा चौकार

दिवसअखेर गुजरातचा स्मित 72, तर सनप्रीत बग्गा 15 धावांवर खेळत होता
CK Naidu Cricket Tournament
CK Naidu Cricket TournamentDainik Gomantak

U-25 CK Nayudu Trophy: गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखत गुजरातच्या चौघांनी अर्धशतके नोंदविली. त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात त्यांना पहिल्या दिवसअखेर 4 बाद 290 अशी सुस्थिती गाठता आली.

सांगे येथील जीसीए मैदानावर रविवारपासून चार दिवसीय सामन्याला सुरवात झाली. गोव्याने बिहारविरुद्ध खेळलेला अकरा सदस्यीय कायम ठेवला. पाहुण्या संघाच्या ऊर्विल पटेल, लक्ष्य कोचर, स्मित पटेल व क्षितीज पटेल यांनी अर्धशतके नोंदविली. दिवसअखेर गुजरातचा स्मित 72, तर सनप्रीत बग्गा 15 धावांवर खेळत होता.

CK Naidu Cricket Tournament
Arjun Tendulkar: अर्जुनचा रस आम्लेटवर ताव; कोकणी बोलत जिंकले अनेकांचे मन

गोव्यासाठी सामन्याची सुरवात आश्वासक ठरली. समीत आर्यन मिश्राने सलामीच्या अभिषेक देसाई याला पायचीत बाद केले, तेव्हा धावफलकावर 37 धावा होत्या, मात्र नंतर गोव्याच्या गोलंदाजांना दिवसभर विकेटसाठी परिश्रम घ्यावे लागले. ऊर्विल पटेल (72) व लक्ष्य कोचर (62) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी करून संघाला शतक ओलांडून दिले. ऊर्विलला फिरकी गोलंदाज दीप कसवणकर याने पायचीत बाद केल्यामुळे जमलेली जोडी फुटली.

CK Naidu Cricket Tournament
Anmod Check Post : कारवाईचे सत्र सुरुच; अनमोड चेक नाक्यावर मोठा दारुसाठा जप्त

लक्ष्य कोचर याने नंतर स्मित पटेलच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 63 धावा जोडल्या. फिरकी गोलंदाज कीथ पटेलने लक्ष्यला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर गुजरातच्या डावात आणखी एक महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. समीत आर्यन मिश्राच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद होण्यापूर्वी क्षितीजने 51 धावा करताना स्मितसमवेत चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भर टाकली.

संक्षिप्त धावफलक

गुजरात, पहिला डाव : 90 षटकांत 4 बाद 290 (अभिषेक देसाई 13, ऊर्विल पटेल 72, लक्ष्य कोचर 62, स्मित पटेल नाबाद 72, क्षितीज पटेल 51, सनप्रीत बग्गा नाबाद 15, शुभम तारी 14-2-49-0, हेरंब परब 15-5-28-0, समीत आर्यन मिश्रा 13-0-52-2, कीथ पिंटो 26-6-74-1, दीप कसवणकर 15-0-63-1, तुनीष सावकार 7-1-24-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com