बाद फेरीमधील स्थान निश्चितीचे गुजरात टायटन्सचे लक्ष्य

फाफ ड्यूप्लेसीस नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसमोर शनिवारी ‘आयपीएल’मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचे सामन्यात आव्हान असणार आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak

फाफ ड्यूप्लेसीस (Faf du Plessis) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसमोर (RCB) शनिवारी ‘आयपीएल’मध्ये (IPL) गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) सामन्यात आव्हान असणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून बाद फेरीमधील स्थान निश्चित करण्याचे गुजरातचे लक्ष्य असणार आहे. (Gujarat Titans aim to secure a place in the knockout stages)

Hardik Pandya
IPL 2022: PBKS वर विजय मिळवल्यानंतरही KL राहुलला का आला राग?

‘आयपीएल’च्या गुणतालिकेत बंगळूरुचा संघ 9 सामन्यांमध्ये 5 विजयांसह सध्या पाचव्या स्थानावरती आहे. यंदाच्या हंगामात पदार्पण करणाऱ्या गुजरात संघाने आतापर्यंत भरीव कामगिरी करताना आठ पैकी सात सामने जिंकून आपल्या नावावरती केले आहेत.

गुजरातची हार्दिकवर भिस्त

गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंडय़ाने (Hardik Pandya) सात सामन्यांत आतापर्यंत सर्वाधिक 305 धावा केल्या. वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, रशीद खान, राहुल तेवतिया यांच्यासारखे तगडे विजयवीर गुजरातच्या ताफ्यात असून, त्यांनी आपली योग्यता दाखवून दिली आहे. गोलंदाजीतही मोहम्मद शमी, लॉकी फग्र्युसन आणि रशीद या त्रिकुटाने तर मैदानावर कमाल केली आहे.

Hardik Pandya
Video: जॉनीची सुपर फिल्डींग, रॉकेट थ्रो करून दीपक हुडाला पाठवल माघारी

विराटबाबत चिंता

विराट कोहली (Virat Kohli) धावांसाठी झगडत असून, हाच बंगळूरुचा प्रमुख चिंतेचा विषय आहे असं म्हणायला हरकत नाही. विराटने यंदा केवळ 128 धावा केल्या, आणि त्यात 48 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मागील दोन सामन्यांत फलंदाजांना येणारे अपयश हेच बंगळूरुच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. डय़ूप्लेसिस, दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी आधीच्या सामन्यांत चांगला खेळ खेळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com