हरभजनचीही वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

हरभजनने आपला निर्णय चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापनाला कळवला आहे. हरभजनच्या माघारीची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर चेन्नई संघ त्याच्याऐवजी बदली खेळाडूची मागणी करणार आहे.

नवी दिल्ली: सुरेश रैनाची अचानक माघार, दोन खेळाडूंसह १३ जणांना झालेली कोरोनाची लागण या धक्‍क्‍यातून सारवत असताना चेन्नई संघाला आणखी एक धक्का बसला आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने वैयक्तिक कारण देत आयपीएलमधून माघार घेतली आहे.

हरभजनने आपला निर्णय चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापनाला कळवला आहे. हरभजनच्या माघारीची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर चेन्नई संघ त्याच्याऐवजी बदली खेळाडूची मागणी करणार आहे.

अपेक्षित निर्णय
हरभजन माघार घेणार हा निर्णय अपेक्षित होता. आयपीएल अमिरातीत होणार हे निश्‍चित झाल्यावर धोनीसह काही खेळाडू चिदंबरम स्टेडियमवर एकत्र आले होते आणि पाच दिवस सरावही केला होता, परंतु त्यात हरभजनचा समावेश नव्हता. चेन्नई संघ अमिरातीस रवाना झाला, त्यावेळीही हरभजनने काही कळवले नव्हते. 

चेन्नई संघाचा सराव सुरू
संघातील १३ सदस्य कोरोनाबाधित झाल्यामुळे चेन्नई संघाला नियोजित वेळेत सराव सुरू करता आला नव्हता, सात दिवसांचे त्यांचे अतिरिक्त विलगीकरण आज संपले. त्यामुळे त्यांनी सराव सुरू केला. दुबईमध्ये दाखल झाल्यानंतर चेन्नई संघाला सरावाची संधीच मिळालेली नव्हती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या