सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी मेहनत : नेस्टर

सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी मेहनत : नेस्टर
Nestor Dias

पणजी,

 एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाचा युवा मध्यरक्षक नेस्टर डायस याने आपण सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू बनण्यासाठी प्रत्येक दिवशी मेहनत घेत असल्याचे सांगितले. संघाने त्याचा करार दोन वर्षांसाठी वाढविला आहे.

एफसी गोवाने आजोशी येथील २१ वर्षीय नेस्टरशी २०२२ पर्यंत करार केला आहे. ‘‘अगोदरच्या मोसमात मला विशेष संधी मिळाली नाहीमात्र मागील मोसमात मी खूप परिश्रम घेतले आणि संघाच्या स्टार्टिंग लाईनअपमध्ये स्थान मिळविले. त्यानंतरही मी मेहनत कायम राखलीपरिणामी मला चांगली कामगिरी करणे शक्य झाले. मोसमासाठी हे माझे लक्ष्य होते व ते साध्य केले,’’ असे नेस्टर आत्मविश्वासाने म्हणाला.

‘‘एफसी गोवा डेव्हलपमेंट संघातून खेळताना गतमोसम विलक्षण ठरला. मी बहुतेक सामने खेळलो. त्यामुळे आत्मविश्वास कमालीचा उंचावला. ड्युरँड कप स्पर्धेत खेळताना चांगला अनुभव प्राप्त झाला. नव्या गोष्‍टी शिकता आल्या,’’ असे गतमोसमाविषयी नेस्टर म्हणाला.

स्पेनच्या आंद्रेस इनिएस्टा याचा खेळ नेस्टरला आवडतो. इनिएस्टाचा दृष्टिकोनत्याच्या चेंडूसह हालचालीत्याचेच पासेसफर्स्ट टच खेळ यामुळे तो जगातील उत्कृष्ट मध्यरक्षक असल्याचे मत नेस्टरने व्यक्त केले.

स्वतःला सिद्ध करण्याचे लक्ष्य

एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाचा दोन वर्षांचा करार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना नेस्टर याने सांगितलेकी ‘‘माझ्यासाठी हे नवे आव्हान आहेत्यासाठी मेहनत कायम असेल आणि येत्या काही वर्षांत स्वतःला सिद्ध करायचे आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com