
Indian Premier League2023: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचे बिगूल वाजले आहेत. आयपीएल 2023 स्पर्धेला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे संघांची तयारीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या प्रोमो शुटचे पडद्यामागचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा पाच वेळचा विजेचा कर्णधार रोहित शर्मा आणि गतविजेत्या गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या दिसून येत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसते की रोहित खांद्यावर स्टाईमध्ये बॅट ठेवत आहे, तर त्याच्या आजूबाजूला काही लोक डान्सही करत आहेत. तसेच हार्दिक वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. दरम्यान, या शुटबद्दल अधिक माहिती समोर आलेली नसली, तरी पडद्यामागील व्हिडिओ समोर आले आहेत.
आयपीएल सुरु होण्यापूर्वी रोहित आणि हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळताना दिसणार आहेत. 17 ते 22 मार्चदरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची मालिका रंगेल. त्यानंतर आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होईल.
आयपीएल 2023 हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याने या हंगामाला सुरुवात होईल.
गेल्यावर्षीप्रमाणेच या हंगामासाठीही 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांचा समावेश आहे. तसेच ब गटात गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स संघांचा समावेश आहे.
या हंगामातही एकूण 70 सामने साखळी फेरीत खेळवले जाणार असून प्रत्येक संघ 7 सामने घरच्या मैदानावर आणि 7 सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळणार आहे. विशेष म्हणजे 2019 नंतर पहिल्यांदाच प्रत्येक संघ घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानांवर सामने खेळताना दिसणार आहेत.
हा हंगाम एकूण 52 दिवसात चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, मोहाली, गुवाहाटी आणि धरमशाला या 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. या हंगामाचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळवला जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.