सहा चेंडूत 6 षटकार लगावणारा ठरला श्रीलंकेचा पहिलाच खेळाडू  

सहा चेंडूत 6 षटकार लगावणारा ठरला श्रीलंकेचा पहिलाच खेळाडू  
He became the first Sri Lankan to hit six sixes off six balls

श्रीलंकेचा विस्फोटक आणि अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराने मोठा विक्रम नोंदवला आहे. एका षटकात 6 षटकार मारणारा परेरा श्रीलंकेचा पहिलाच खेळाडू ठरला. थिसाराने गेन मेजर क्लब लिमिटेड ओव्हर टूर्नामेंटच्या ग्रुप ए सामन्यामध्ये ही कामगिरी केली आहे. श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब आणि ब्लूमफिल्ड क्रिकेट क्लब यांच्यात हा सामना खेळवला गेला होता.

पावसामुळे 50 षटकांचा असणारा सामना 41 षटकांचा खेळवला गेला. कप्तान थिसारा परेराने विस्फोटक फलंदाजी केल्यामुळे श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या 3 बाद 282 झाली होती. आक्रमक थिसाराला गोलंदाज दिलहन कुरेला रोखता आले नाही. त्याने टाकलेल्या चार षटकामध्ये 73 धावा पटकावल्या. मात्र पावसामुळे सामना अनिर्णित घोषीत करण्यात आला. (He became the first Sri Lankan to hit six sixes off six ball)

एकाच षटकात 6 षटकार लगावणारा थिसारा परेरा हा नववा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर देशातंर्गत क्रिकेटमध्ये तो सहावा खेळाडू ठरला आहे. युवराज सिंग, हर्षल गिब्ज, कायरन पोलार्ड हे तीनच फलंदाज आहेत, ज्यांनी आंतरराष्ट़्रीय क्रिकेटमध्य़े ही अतुलनीय कामगिरी केली आहे.

गारफिल्ड सोबर्स यांनी सहा चेंडूमध्य़े 6 षटकार मारण्याची कामगिरी केली, विशेष म्हणजे ते पहिले फलंदाज होते. 1986  मध्ये त्यांनी हा अफलातून करिष्मा केला होता. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 1985 मध्ये एका षटकात 6 षटकार लगावले होते. त्यानंतर तब्बल 22 वर्षाचा कालावधी जावा लागला. 2007 च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्सने एका षटकात 6 षटकार लगावले. तसेच 2007 मध्ये टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 6 षटकार लगावले होते. दहा वर्षानंतर इंग्लंडच्या रॉस व्हाइटलीने यॉर्कशायर वायकिंग्जविरुद्ध नेटवेस्ट टी-ट्वेन्टी ब्लास्टमध्ये 6 षटकार ठोकले.

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड याने काही आठवड्यापूर्वीच टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध अकिला धनंजयाला 6 षटकार मारले होते. आता थिसारा परेरा हा ए-लिस्ट क्रिकेटमध्ये 6 षटकार ठोकणारा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.  

 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com