माजी फुटबॉलपटू मदेरा कोविड योद्ध्यांच्या मदतीस

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

गोवा शीख यूथ कम्युनिटी किचनला त्यांनी मदतीचा हात दिला.

पणजी : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय गोमंतकीय फुटबॉलपटू आणि आता फुटबॉल प्रशिक्षण मार्गदर्शक या नात्याने कार्यरत असलेले सावियो मदेरा (Savio Madera)  यांनी नुकताच सामाजिक बांधिलकेचा पैलू प्रदर्शित केला. कोविड-19 (Covid 19) महामारीच्या काळात मदतकार्य करणाऱ्या गोवा शीख यूथ कम्युनिटी किचनला त्यांनी मदतीचा हात दिला. (With the help of former footballer Madera Kovidyoddhya)

महामारीच्या कठीण काळात गोवा शीख कम्युनिटी किचनद्वारे बांबोळी येथील गोवा (Goa) वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळाच्या मुख्यप्रवेद्वाराजवळ गरजूंना मोफत भोजन पुरविले जाते. याशिवाय त्यांच्यातर्फे राज्यातील विविध ठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) सिलिंडर्सही सोय केली जाते. मदेरा यांनी या कम्युनिटीस सहकार्य करून त्यांच्या मानवतावादी कार्यास शाबासकीही दिली.

Olympics: भारतीय संघापासून जपानवासीयांना धोका

गोवा शीख कम्युनिटी किचनला केलेल्या मदतीविषयी मदेरा यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या संकेतस्थळास माहिती दिली आहे. त्यानुसार, बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेर मोफत भोजन पुरविणाऱ्या या समाजसेवी संस्थेस कडधान्ये आणि इतर बाबींसाठी देणगी हवी असल्याचे मदेरा यांना समजले. मानवतावादी कार्य करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मदेरा यांनी मदत केली. खरं म्हणजे, मदेरा यांच्या या परोपकारी कार्याची माहिती उघड झाली नसती, पण संस्थेच्या एका युवा कार्यकर्त्याने भारताच्या या माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूसमवेत छायाचित्र काढून घेतले आणि मदेरा यांची सामाजिक बांधिलकी उघडकीस आली.

माजी ऑलिंपियन फुटबॉलपटू फ्रांको यांचे निधन

``प्रसिद्धीसाठी मी इतरांना मदत करत नाही. एखाद्याला मदत व्हावी आणि त्याबद्दल आनंद वाटणे ही भावना आहे,`` असे मदेरा म्हणाले. ``गरजवंतांना माझ्यापरीने थोडीफार मदतीचा हातभार लावतो. आम्ही जेव्हा त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांना खूप बरं वाटते, हे जास्त महत्त्वाचे आहे,`` असे मदेरा पुढे म्हणाले. कोविड महामारीविरोधात लढताना मानसिकदृष्ट्या कणखर राहणे आवश्यक असल्याचा सल्ला भारताच्या या माजी फुटबॉलपटूने दिला.

सावियो मदेरा यांच्याविषयी...

- गोव्यातील साळगावकर एफसीचे 17 वर्षे प्रतिनिधित्व

- मध्यरक्षक या नात्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदानावर यशस्वी कारकीर्द

- निवृत्तीनंतर फुटबॉल प्रशिक्षणात कार्यरत

- भारताच्या सीनियर राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक

- त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत 2011 मध्ये सॅफ कप विजेता

- सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रशिक्षक शिक्षण विभागाचे प्रमुख
 

संबंधित बातम्या