मिताली राजने रचला इतिहास; 10,000 धावा करणारी भारताची पहिली महिला फलंदाज

मिताली राजने रचला इतिहास; 10,000 धावा करणारी भारताची पहिली महिला फलंदाज
History made by Mithali Raj first Indian female batsman to score 10000 runs

लखनौ : भारतीय महिला क्रिकेट वन डे  संघाची कर्णधार मिताली राजने आज इतिहास रचला. मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  10,000  धावांचा टप्पा पूर्ण करणारी जगातली दुसरी आणि भारताची एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात तिने हा विक्रम केला.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात मितालीने 50 धावांची खेळी साकारली

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी मितालीला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी 85 धावांची गरज होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने 50 धावा केल्या. दुसर्‍या सामन्यात तिला फलंदाजीची संधी मिळाली नाही, आज तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ती 50 चेंडूंत 36 धावा काढून बाद झाली. म्हणजेच 10 हजार एक धावा केल्याबरोबर तिची खेळीही संपुष्टात आली. भारताच्या या 38 वर्षीय महिला क्रिकेटपटूने भारतासाठी तिन्ही स्वरूपात मोठ्या प्रमाणात धावा केल्या आहेत.

शार्लोट एडवर्ड्सने सर्वाधिक धावा केल्या आहेत

महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सने केल्या असून, तिने 
10,273 धावा केल्या आहेत. 2016 मध्ये आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम देणाऱ्या या माजी महिला क्रिकेटपटूने 191 एकदिवसीय सामन्यात 5992, 23 कसोटी सामन्यांत 1769 आणि 95 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2605 धावा केल्या आहेत. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com