IPL 2021: विराट कोहलीने रचला इतिहास

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

आयपीएल 2021 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) काल झालेल्या सामन्यात  राजस्थान रॉयल्सला (RR) 10 गडी राखून पराभूत केले.

आयपीएल 2021 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) काल झालेल्या सामन्यात  राजस्थान रॉयल्सला (RR) 10 गडी राखून पराभूत केले. आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले कर्णधार विराट कोहली (VIRAT KOHLI)  आणि देवदत्त पडिक्कल यांनी नाबाद खेळी करत  आपल्या संघाला विजय मिळवून दिला .या सामन्यात देवदत्तने  शानदार शतक ठोकले तर विराट कोहलीने नाबाद 72 धावा केल्या.  या खेळीत त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. या खेळीदरम्यान विराट कोहलीने इतिहास रचला आहे . विराटने आयपीएलच्या (IPL) स्पर्धेत 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 6 हजार धाव करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. (History made by Virat Kohli)

IPL 2021: हरभजन सिंगच्या पाया पडला सुरेश रैना; व्हिडिओ होतोय व्हायरल

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट आहे.  संपूर्ण आयपीएलमध्ये त्याने 196 सामन्यात 6021  धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यं 5 शतके आणि 40 अर्धशतके झळकावली आहेत. रणमशीन म्हणून ओळखला जाणारा कोहली पहिल्या सत्रापासून आरसीबीकडून खेळत आहे. त्याचबरोबर या लीगमध्ये कर्णधार म्हणून धावांचा पाठलाग करताना त्याने 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करत असताना विराट 18 अर्धशतके झळकावली आहेत. 

 

याशिवाय राजस्थानविरुद्ध त्याने 500 धावाही पूर्ण केल्या आहेत. सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीसह युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल (DEVDUTT PADIKKAL) याने पहिल्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी केली. जी या लीगमधील आरसीबीसाठी पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली. विराट कोहलीचा हा फॉर्म आरसीबीसाठी खूप फायदेशीर आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आरसीबीचीचा संघ स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे.

संबंधित बातम्या