बांगलादेशच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, '145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये...'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी बांगलादेशचा डाव 103 धावांवर आटोपला.
Bangladesh cricket team
Bangladesh cricket teamDainik Gomantak

बांगलादेश (Bangladesh) हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याचे 6 फलंदाज सलग दोन कसोटी सामन्यांच्या एका डावात खाते न उघडता बाद झाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी बांगलादेशचा डाव 103 धावांवर आटोपला. यामध्ये 6 खेळाडू शून्यावर बाद झाले. याआधी, श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावातही बांगलादेशच्या 6 खेळाडूंना खातेही उघडता आले नव्हते. (BAN vs WI Test Match)

Bangladesh cricket team
Commonwealth Games 2022 : नीरज चोप्रा करणार अ‍ॅथलेटिक्स संघाचे नेतृत्व

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे 7 वेळा घडले आहे, जेव्हा एकाच डावात एका संघाचे 6 खेळाडू शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतवले आहेत. यापैकी बांगलादेशसोबत असे तीनदा घडले आहे. बांगलादेशने हा लाजिरवाणा विक्रम 2022 मध्ये दोनदा आणि 2002 मध्ये एकदा केला आहे. 2002 मध्येही वेस्ट इंडिजविरुद्ध बांगलादेशचे केवळ 6 खेळाडू शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्याचवेळी, 1980 मध्ये पाकिस्तान, 1996 मध्ये दक्षिण आफ्रिका, 2014 मध्ये इंग्लंड आणि 2018 मध्ये न्यूझीलंडसोबत असे घडले आहे.

Bangladesh cricket team
डेल स्टेन बनला ऋतुराज गायकवाडचा जबरा फॅन, 'दोनच वर्षात बदलला खेळ'

बांगलादेशचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे

बांगलादेशचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. येथील नॉर्थ साऊंडमध्ये दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा डाव 103 धावांवर आटोपला. महमुदुल, नजमूल, मोमिनूल, नुरुल, मुस्तफिझूर आणि खालिद एकही धाव न काढता बाद झाले. कर्णधार शकीब अल हसनने 51 धावांची खेळी खेळून बांगलादेशला 100 च्या पुढे नेले. शकीबशिवाय तमीम इक्बाल (२९) आणि लिटन दास (12) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्याचवेळी हसन मिर्झा 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com