हिटमॅन व सूर्यकुमारचा अफलातून डान्स होतोय प्रचंड व्हायरल

हिटमॅन व सूर्यकुमारचा अफलातून डान्स होतोय प्रचंड व्हायरल
Hitman and Suryakumar are dancing wildly

मुंबई: इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएल) नव्या पर्वाला आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे. या लीगमधील सर्व संघ जय्यत तयारीला लागले आहेत. सरावानंतर सर्व संघ फोटोशूट, प्रमोशन, यामध्ये व्यस्त आहेत. यातच आयपीएलमध्ये पाच वेळा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात चक्क मुबंई इंडियन्स संघाचे खेळाडू एका ‘आगरी’ गाण्यावर डान्स करत आहेत.

सुप्रसिध्द आगरी गीत ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’  या गाण्यावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहीत शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, थिरकताना दिसत आहेत. या गाण्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. खरं तर या व्हिडिओमधील गाणे आणि या खेळाडूंचा डान्स वेगळा असून चाहत्यांना कोणत्या खेळाडूची स्टेप आवडली आहे, असा सवाल मुंबईने कॅप्शनमध्ये विचारला आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. (Hitman and Suryakumar are dancing wildly)

आयपीएलमधील रोहीत शर्मा हा यशस्वी कर्णधार आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये पाच वेळा मुंबई इंडियन्स संघाला चॅम्पियन बनवले आहे. आणि या आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघ म्हणून किताब मिळवला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा यंदाच्या पर्वात 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुंरुशी चेन्नईमध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स संघात रोहीत शर्मा, क्रुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन, जसप्रीत बुमराह यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com